शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

जळगाव आयुर्वेद कॉलेजसाठी नागपूरच्या शिक्षकांवर डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 20:15 IST

जळगाव येथे पाचव्या आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. या वर्षीपासून १०० ‘बीएएमएस’ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, या महाविद्यालयासाठी मान्यता देण्यात आलेली ३५० पदे अद्यापही भरली नाहीत. परिणामी, नागपूरसह उस्मानाबाद, नांदेड व मुंबईच्या कॉलेजमधून प्रतिनियुक्तीवर (उसणवारी) पदे भरली जाणार आहे, असे झाल्यास नागपूर आयुर्वेद महाविद्यालय अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशासकीय आयुर्वेद महाविद्यालय : रिक्त पदांमुळे महाविद्यालय अडचणीत येण्याची शक्यता

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : जळगाव येथे पाचव्या आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. या वर्षीपासून १०० ‘बीएएमएस’ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, या महाविद्यालयासाठी मान्यता देण्यात आलेली ३५० पदे अद्यापही भरली नाहीत. परिणामी, नागपूरसह उस्मानाबाद, नांदेड व मुंबईच्या कॉलेजमधून प्रतिनियुक्तीवर (उसणवारी) पदे भरली जाणार आहे, असे झाल्यास नागपूर आयुर्वेद महाविद्यालय अडचणीत येण्याची शक्यता आहे.राज्यात नागपूर, नांदेड, उस्मानाबाद व मुंबई या चार ठिकाणीच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालये आहेत.आयुर्वेदाचे वाढते महत्त्व व लोकांचा आयुर्वेद उपचाराकडे वाढता कल पाहता केंद्र शासनाने जळगावच्या आयुर्वेद महाविद्यालयाला १ ऑगस्ट २०१९ रोजी मंजुरी दिली. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार १०० एवढी राहणार आहे. यावर्षीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सूत्रानुसार, मे २०१७ मध्ये शासनाने या महाविद्यालयासाठी ३५० पदांना मंजुरी दिली. मात्र, अद्याप शासनाने पदभरती केली नाही. यामुळे नागपूर, उस्मानाबाद, नांदेड व मुंबईच्या कॉलेजमधून प्रतिनियुक्तीवर पदे भरली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, नागपुरातील आयुर्वेद महाविद्यालयात एकूण ६४ अध्यापकांच्या जागा मंजूर आहेत. यातील ११ जागा रिक्त आहेत. महाविद्यालयात ‘पीजी’च्या ६० वरून ८४ जागांवर प्रवेश देण्याच्या प्रयत्नात आहे. या जागांसाठी ७५ अध्यापकांची गरज आहे. यातच ऑगस्ट २०१९ मध्ये तीन अध्यापक निवृत्त होणार आहे. यामुळे येथील शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर पाठविल्यास महाविद्यालय अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरGovernment ayurvedic college nagpurशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर