४५० नागरिकांची नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:47+5:302021-02-06T04:14:47+5:30
मांढळ : काशिनाथ निरंगुळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मांढळ (ता. कुही) येथे राेगनिदान व नेत्रतपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ...

४५० नागरिकांची नेत्र तपासणी
मांढळ : काशिनाथ निरंगुळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मांढळ (ता. कुही) येथे राेगनिदान व नेत्रतपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ४५० नागरिकांची आराेग्य व डाेळ्यांची माेफत तपासणी करण्यात आली असून, यातील १३६ नागरिकांना चश्म्यांचे वाटप करण्यात आले.
या शिबिरात नागरिकांची मोफत ब्लड शुगर व इतर तपासण्यांसाेबतच डाेळ्यांचीही तपासणी करण्यात आली. नागपूर येथील महात्मे नेत्रपेढीचे डॉ. माधव सदावर्ती, डॉ.अमित मुसळे, डॉ.सुनीलकुमार पांडे, डॉ.विजय गजभिये, डॉ.विलास सेलोकर, डॉ.रमेश वासे, डॉ.सोमराज लेंडे, श्रीकांत डोळस, डॉ.हंसराज सोनकुसरे, डॉ.रजनिकांत हळबे, डॉ.गजेंद्र निरंगुळकर यांनी रुग्णांना सेवा प्रदान केली. याप्रसंगी सरपंच शाहू कुलसंगे, उपसरपंच सुखदेव जिभकाटे, लीलाधर धनविजय, अजय निरंगुळकर, गिरीधरी निरंगुळकर, रामभाऊ निरंगुळकर, श्रीराम नागपुरे, रामेश्वर निरंगुळकर, सुमन कुलरकर, वसंता पडोळे, गौतम वाघमारे, बंडू वैद्य, प्रदीप कुलरकर, गोमा गोटेफोडे, प्रदीप घुमडावर, सज्जन पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.