१२० बसचालकांची नेत्रतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:23+5:302021-02-06T04:13:23+5:30

सावनेर : राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत लायन्स क्लबच्यावतीने सावनेर शहरात नेत्रतपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात एसटी महामंडळांतर्गत ...

Eye examination of 120 bus drivers | १२० बसचालकांची नेत्रतपासणी

१२० बसचालकांची नेत्रतपासणी

सावनेर : राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत लायन्स क्लबच्यावतीने सावनेर शहरात नेत्रतपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात एसटी महामंडळांतर्गत कार्यरत असलेल्या १२० बसचालकांच्या डाेळ्यांची माेफत तपासणी करण्यात आली असून, त्यांना डाेळ्यांच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी डाॅ. विजय धाेटे हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी (महसूल) अतुल म्हेत्रे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष ॲड. अरविंद लोधी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी, लॉयन्स क्लबचे श्रवण कुमार, डॉ. मनिषा ठक्कर उपस्थित होते. सावनेर लायन्स क्लबचे अध्यक्ष वत्सन बांगरे यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी १२० बसचालकांच्या डाेळ्यांची तपासणी करण्यात आली. ही जबाबदारी डॉ. विरल शहा, रुकेश मुसळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. शिबिराला नगरसेवक निलेश पटे, सावनेर तालुका पत्रकार संघाचे सचिव योगेश पाटील, आगार व्यवस्थापक राकेश रामटेके, मुकुंद देशपांडे, परेश झोपे, डॉ. अमित बाहेती, ॲड. मनोज खंगारे, डॉ. विजय पुण्यानी, ॲड. अभिषेक मुलमुले, प्रा. विलास डोईफोडे, सचिन नबीरा, मिथिलेश बालाखे, हितेश पटेल यांनीही हजेरी लावली हाेती. संचालन डॉ. अरविंद बटले यांनी केले किशोर सावल यांनी आभार मानले.

Web Title: Eye examination of 120 bus drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.