शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

तर नागपूर शहरासाठी कन्हानमधून अतिरिक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 8:19 PM

अपुरा पाऊस आणि पेंच जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे उपलब्ध जलसाठ्यानुसार नागपूर शहरासाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. पाणी आरक्षणात करण्यात आलेली कपात विचारात घेता महापालिका प्रशासनाने संभाव्य उपाययोजना राबविण्याला सुरुवात केली आहे. आरक्षित कोट्यावरील भार कमी करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण कें द्रातून अधिक क्षमतेने पाणी उपसण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे.

ठळक मुद्देसंभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनामनपा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ४० ते ५० एमएलडीने वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपुरा पाऊस आणि पेंच जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे उपलब्ध जलसाठ्यानुसार नागपूर शहरासाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. पाणी आरक्षणात करण्यात आलेली कपात विचारात घेता महापालिका प्रशासनाने संभाव्य उपाययोजना राबविण्याला सुरुवात केली आहे. आरक्षित कोट्यावरील भार कमी करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण कें द्रातून अधिक क्षमतेने पाणी उपसण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे.कन्हान जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता दररोज २५० एमएलडी आहे. परंतु पूर्ण क्षमतेने पाणी उचलले जात नाही. सध्या येथून १९० एमएलडी पाणी उचलले जाते. केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी नवीन पाईपलाईनची जोडणी केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे यांनी दिली. संभाव्य जलसंकट लक्षात घेता पिण्याचा पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने करा, सोबतच नवीन जलस्रोत निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिले होते. त्यानुसार जलप्रदाय विभाग कामाला लागला आहे. पाणी बचतीसोबतच बोअरवेल, सार्वजनिक विहिरीतील पाण्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.पेंच प्रकल्पांतर्गत असलेल्या तीन धरणांमध्ये महापालिकेसाठी दरवर्षी १९० दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवले जात होते. परंतु यावर्षी धरणात केवळ २८३.६६८ दश लक्ष घन मीटर म्हणजे २२.४८ टक्के साठा उपलब्ध असल्याने महापालिकेचे आरक्षण १५५ दलघमी करण्यात आले आहे.नागपूर शहरासाठी पेंच जलाशयातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या मर्यादा बघता कन्हानमधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची व्यवस्था करणे तसेच कन्हान-कोलार नदीवर प्रकल्प बांधून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पर्याय म्हणून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.सार्वजनिक ५४३ विहिरींचा वापर करणारउन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेता शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे. शहरात ७८४ सार्वजनिक विहिरी आहेत. यातील ५४३ वापरण्यायोग्य आहेत. यातील ४२५ विहिरींची स्वच्छता करण्याचे प्रस्ताव आले होते. यातील ३४३ विहिरींची सफाई करण्यात आली आहे. १०१ विहिरींवर मोटरपंप लावण्याचे प्रस्ताव आले होते. यातील ५२ विहिरीवल पंप लावण्यात आले. उर्वरित विहिरीवर लवकरच पंप बविण्यात येणार आहेत.३४७ बोअरवेल खोदण्याचे प्रस्तावितगेल्या वर्षी नागपूर शहरासाठी ९ कोटी ४२ लाखांचा पाणीटंचाई कृ ती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ३४७ विंधन विहिरी(बोअरवेल) प्रस्तावित होत्या. मात्र हा प्रस्ताव कार्यान्वित झाला नव्हता. यावर्षी परिस्थिती बिकट असल्याने या बोअरवेलची कामे हाती घेतली जाणार आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे. शासनाकडून यासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी महापालिकेला अपेक्षा आहे.

टॅग्स :Kanhan Riverकन्हान नदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका