शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

चित्रकारांच्या अभिव्यक्तितून अस्वस्थ भारताचे दर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:40 PM

गेल्या काही वर्षात देशात वाढलेली असहिष्णूता हे चिंतनाचे व चिंतेचे कारण ठरले आहे. वाढलेली धर्मांधता, जातीय हिंसाचार, गाईच्या नावाने हिंसक होणारा समाज, विरोधकांना लक्ष्य करणे, असे अनेक प्रश्न आणि या सर्वांमध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक, असे अस्वस्थ करणारे वास्तव दिसत आहे. साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांनी याविरुद्ध आवाज बुलंद केला आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कलावंतांनी आवाज उठवला की, तो दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो हा जगाचा इतिहास आहे. परंतु लक्ष्य केले जाते म्हणून गप्प राहू नका कारण गप्प राहिले तरी लक्ष्य व्हाल. त्यापेक्षा सामुदायिकपणे या अस्वस्थ वातावरणाविरुद्ध आवाज उठवा, असा संदेश देत सेक्युलर चित्रकला प्रदर्शनाला शुक्रवारी नागपुरात सुरुवात झाली.

ठळक मुद्दे नागपूरच्या  मध्यवर्ती संग्रहालयात तीन दिवसीय प्रदर्शन : नामवंत चित्रकारांच्या कलाकृती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षात देशात वाढलेली असहिष्णूता हे चिंतनाचे व चिंतेचे कारण ठरले आहे. वाढलेली धर्मांधता, जातीय हिंसाचार, गाईच्या नावाने हिंसक होणारा समाज, विरोधकांना लक्ष्य करणे, असे अनेक प्रश्न आणि या सर्वांमध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक, असे अस्वस्थ करणारे वास्तव दिसत आहे. साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांनी याविरुद्ध आवाज बुलंद केला आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कलावंतांनी आवाज उठवला की, तो दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो हा जगाचा इतिहास आहे. परंतु लक्ष्य केले जाते म्हणून गप्प राहू नका कारण गप्प राहिले तरी लक्ष्य व्हाल. त्यापेक्षा सामुदायिकपणे या अस्वस्थ वातावरणाविरुद्ध आवाज उठवा, असा संदेश देत सेक्युलर चित्रकला प्रदर्शनाला शुक्रवारी नागपुरात सुरुवात झाली.अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर, माजी पोलीस सहा.आयुक्त भरत शेळके, डॉ. अशोक गायकवाड, माजी कला संचालक प्रा. हेमंत नागदिवे, ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रमोदबाबू रामटेके, इ.मो. नारनवरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मध्यवर्ती संग्रहालयाच्या (अजब बंगला) कलादालनात या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे संचालन बबन चहांदे यांनी केले तर तुका कोचे यांनी आभार मानले. गौतमीपुत्र कांबळे यांच्या संकल्पनेतील हे चित्रप्रदर्शन यापूर्वी कोल्हापूर येथे भरविण्यात आले होते. प्रा. प्रमोदबाबू यांच्यासह प्रा. मोग्गलान श्रावस्ती, प्रा. प्रकाश भिसे, प्रा. बाळासाहेब पाटील, प्रा. दिलीप बडे, नंदकुमार जोगदंड, प्रा. राजेंद्र महाजन, राजू बाविस्कर, सिकंदर मुल्ला, फारूक नदाफ, विक्रांत भिसे, निखिल राजवर्धन, गोपानाथ गंगवाने, सतीश गायकवाड, स्नेहा अलास्कर, अभिजित साळुंखे, सुनील अवचार अशा देशातील ४० नामवंत चित्रकारांच्या चित्रकृती यामध्ये समाविष्ट आहेत.सेक्युलर विचारांना मानणाऱ्या देशभरातील चित्रकारांनी देशातील अस्वस्थता रेखाटून मनातील खदखद त्यांच्या चित्रांद्वारे व्यक्त केली आहे. भारतीय संविधान व प्रतीक राजमुद्रा यांच्या भोवताल घोंगावणारे कावळे व त्यामुळे धोक्यात आलेली लोकशाही, घरच्या पिंजऱ्यात आणि पिंजऱ्याबाहेरही असुरक्षित आणि दु:खी असलेली स्त्री, पुन्हा पुराणवादाकडे घड्याळाचे उलटे फिरणारे काटे, लैंगिक असमानता, व्यवस्थेच्या चक्कीत पिसला जाणारा सामान्य माणूस, संविधानामुळे स्त्रीला उंच उडण्यासाठी मिळालेले पंख अशा अप्रतिम कलाकृतींचे दर्शन या प्रदर्शनात होत आहे, जे कोणत्याही संवेदनशील माणसांना नक्कीच भावणारे आहे. २१ आॅक्टोबरपर्यंत हे चित्रप्रदर्शन चालणार आहे. 

टॅग्स :painitingsपेंटिंगNagpur Central Museumनागपूर मध्यवर्ती संग्रहालय