शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नागपुरी संत्र्याची निर्यात वाढणार : चर्चासत्रात कृषी तज्ज्ञांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:55 IST

नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे. संत्र्याला जागतिक ब्रॅण्ड म्हणून पुढे आणायचे असल्यास शेतकऱ्यांना शासनाने आधुनिक सोयीसुविधा पुरविण्याची गरज आहे. शासन, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या काम करून उत्पादन आणि निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत कृषी विशेषज्ञांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देझाडांची निगा व तोडणीपश्चात प्रक्रिया महत्त्वाची

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे. टेबल फ्रूट म्हणून सर्वत्र मागणी आहे. संत्र्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून शेतकऱ्यांतर्फे प्रचंड मेहनत घेतली जाते. पण एखाद्या वेळी नैसर्गिक आपत्तीने संत्री खराब झाल्यास उत्पादक आर्थिक संकटात येतो. तोडणीपश्चात संत्र्यावर करण्यात येणाऱ्या आधुनिक प्रक्रियेच्या सोयीसुविधा इस्रायल येथील शेतकऱ्यांप्रमाणे प्रत्येकाच्या शेतात असाव्यात, अशी मागणी पुढे आली आहे. संत्र्याला जागतिक ब्रॅण्ड म्हणून पुढे आणायचे असल्यास शेतकऱ्यांना शासनाने आधुनिक सोयीसुविधा पुरविण्याची गरज आहे. शासन, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या काम करून उत्पादन आणि निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत कृषी विशेषज्ञांनी व्यक्त केले.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या तीन दिवसीय वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी तांत्रिक सत्रात राज्य आणि केंद्रामध्ये कार्यरत वरिष्ठ कृषी विशेषज्ञ, वैज्ञानिक आणि उत्पादकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.संत्रा पीक वाढविण्याचे प्रयत्नमिझोरममध्ये संत्र्यांचे उत्पादन वाढविणे, हे जिकिरीचे काम आहे. त्यासाठी राज्य सरकार संशोधन आणि विकासावर विशेष प्रयत्न घेते. संत्र्याच्या मशागतीसाठी अनेक अडचणी आहेत. डोंगराळ प्रदेशात उतरत्या जागेवर संत्र्यांचे पीक घेतले जाते. सध्या राज्यात १६,०३० हेक्टरवर संत्र्याची लागवड आहे. पण अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट होते. माती आम्लीय, झिंकची कमतरता असून कीटकांवर काहीही नियंत्रण नाही. एमआयडीएचतर्फे बागायतदारांना व्यवस्थापनावर प्रशिक्षण देण्यात येते.पी.सी. लालनघाहसंगीवैज्ञानिक, हॉर्टिकल्चर विभाग, मिझोरम.आॅनलाईनने शेतकी उत्पादने विका‘राष्ट्रीय कृषी बाजार’ (एनएएम) हे शेतकऱ्यांना शेतकी उत्पादने विकण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ई-नाम हे इलेक्ट्रॉनिक्स पोर्टल असून, त्यामुळे राज्य आणि केंद्रामध्ये पारदर्शकता आली आहे. या पोर्टलचे उद्घाटन १४ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावर १४ राज्यांमधील ४७० बाजारपेठांना जोडले आहे. २०१८ पर्यंत एकूण ५८५ बाजारपेठा जोडण्यात येणार आहेत. ९० कृषिमालाची नोंदणी असून त्यात संत्र्याचा समावेश आहे. अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड करता येतो.गुंजन शिवहरेअधिकारी, ‘ई-नाम’.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर