शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देणार की नाही, हे स्पष्ट करावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 23:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपण अतिशय विसंगतीपूर्ण देशात राहतो. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले त्यांच्याविषयी आपणा ...

ठळक मुद्देइतिहास संशोधक विक्रम संपथ यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण अतिशय विसंगतीपूर्ण देशात राहतो. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले त्यांच्याविषयी आपणा सगळ्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार जडल्यागत स्थिती सध्याची आहे. ज्या सत्तेविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर लढले, तीच सत्ता अर्थात लंडन सावरकरांचा भारतीय देशभक्त आणि महान तत्त्वचिंतक म्हणून गौरव करते. आपल्याकडे मात्र, त्याच सावरकरांची बदनामी केली जाते. अशा सावरकरांना भारतरत्न देणार की नाही, हे भारत सरकारने स्पष्ट करावे.. असे आवाहन प्रसिद्ध लेखक व इतिहास संशोधक डॉ. विक्रम संपथ यांनी केले.मंथन ऑर्गनायझेशनच्यावतीने चिटणवीस सेंटर येथे आयोजित ‘वीर सावरकर : विस्मृतीत केलेल्या भूतकाळाचा प्रतिध्वनी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.लंडन येथील इंडिया हाऊसमध्ये त्यांचे वास्तव्य होते. तेथे स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती एक भारतीय देशभक्त आणि महान चिंतक म्हणून जपली जात आहे. मात्र, आपल्याकडे आमच्याच महान पुरुषांचा प्रत्येक व्यासपीठावर अपमान करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. भारतीय शिक्षणव्यवस्थेत अगदी सुरुवातीपासूनच महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांचा तिटकारा दिसतो. त्यामुळेच, नव्या पिढीला सावरकर माहीत नाहीत. सावरकर हे पूर्ण स्वातंत्र्याबद्दल बोलणारे पहिले भारतीय होत. ‘सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय’ ही घोषणा त्यांचीच होती. सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांतावर कधीच विश्वास ठेवला नाही. पाकिस्तानच्या स्थापनेला कधीच पाठिंबा दिला नाही. त्यांचे विचार आणि श्रद्धा कार्ल मार्क्सद्वारे प्रेरित नाहीत. मात्र, त्यांच्याविषयी भ्रम पसरविण्यात येत असल्याचे डॉ. विक्रम संपथ म्हणाले. डॉ. विक्रम संपथ यांचे श्रीधर गाडगे यांनी स्वागत केले. रसिका जोशी व सागर मिटकरी यांनी संचालन केले तर आभार ऋषिकेश वानोडे यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूर