शहरात जम्बो कोविड केंद्रासाठी तज्ज्ञ चमूची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:50+5:302021-04-17T04:07:50+5:30
शहरातील वाढता कोरोनाचा ताण पाहता कोविड जम्बो सेंटर उभारण्याचे जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मानकापूर विभागीय क्रीडा संकुल, ...

शहरात जम्बो कोविड केंद्रासाठी तज्ज्ञ चमूची चाचपणी
शहरातील वाढता कोरोनाचा ताण पाहता कोविड जम्बो सेंटर उभारण्याचे जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मानकापूर विभागीय क्रीडा संकुल, विद्यापीठ परिसर, विद्यापीठातील मैदान, ईसआयसी हॉस्पिटल, हज हाऊस या ठिकाणाची पाहणी करून प्राथमिक माहिती घेण्यात आली असून, लवकरच हा चमू प्रस्ताव सादर करणार आहे.
ग्रामीण भागातील सद्य:स्थितील बेडसंख्या आणि आगामी नियोजन करून अहवाल सादर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सूचना करण्यात आली. सालई गोधनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या परिसरातील रुग्णांसाठी क्षमतेनुसार बेड तयार करण्यास सांगण्यात आले. नागपुरातील व्हेंटिलेटरचा तुटवडा लक्षात घेता विशाखापट्टणम येथील संस्थेने मशीनचे सादरीकरण केले. तज्ज्ञ डॉक्टरांकडून याची चाचपणीदेखील करण्यात आली असून, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीनची व्यावहारिकता व उपलब्धता लवकर तपासली जाणार आहे आणि त्यानुसार नागपूरसाठी खरेदी करण्यात येणार आहे.
आरटीपीसीआर चाचणीसाठी क्रिस्पर फेलुदा मशीनची मागणी
आरटीपीसीआर चाचण्यांसाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून अत्याधुनिक क्रिस्पर फेलुदा मशीनची मागणी करण्यात आली आहे. क्रिस्पर फेलुदा मशीनमुळे आरटीपीसीआर चाचणी ३० मिनिटांत येत असल्याने चाचण्या जलदगतीने होतील.