मच्छीबाजार रस्त्याचे रुंदीकरण होणार

By Admin | Updated: August 24, 2016 02:48 IST2016-08-24T02:48:04+5:302016-08-24T02:48:04+5:30

सेंट्रल एव्हेन्यूवरील मच्छीबाजार रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने येथील चिकन दुकाने

Expansion of fisheries road | मच्छीबाजार रस्त्याचे रुंदीकरण होणार

मच्छीबाजार रस्त्याचे रुंदीकरण होणार

चिकन दुकान व ओट्यांचे बांधकाम तोडले
नागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवरील मच्छीबाजार रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने येथील चिकन दुकाने व ओटे तोडण्याची कारवाई केली.
हॉटेल शिवराजच्या मागील रस्ता रुंद करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मच्छी बाजार ते बजेरिया चौकापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले. काही मासे विक्रेत्यांनी बांधलेले सिमेंट ओटे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. यात मार्गावर चिकन दुकानाचे लोखंडी कंपाऊंड तोडण्यात आले. बजेरिया चौकातून तीन हातठेले जप्त करण्यात आले. यापूर्वी पथकाने हनुमाननगर झोन अंतर्गत तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा चौकापर्यंत २५ अतिक्रमण हटविले. या रस्त्यावर फळ विक्रेत्यांसह पूजेचे साहित्य विकणाऱ्यांची दुकानेही हटविण्यात आली. ही कारवाई अली, संजय शिंगणे, शरद इरपाते व पोलीस पथकाने केली. कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकाला एका दुकानदार महिलेने दिवसभर त्रास दिला. यापूर्वी झालेल्या कारवाईत चंद्रमणीनगर चौकात एका महिलेचा ठेला जप्त करण्यात आला होता. मात्र, ठेला नेऊन गोदामात ठेवताना तो तुटला. ती महिला आपला ठेला दुरुस्त करून देण्याची मागणी पथकाकडे करीत होती. (प्रतिनिधी)

Web Title: Expansion of fisheries road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.