विस्तृत करआधार मोठे आवाहन
By Admin | Updated: September 15, 2014 01:00 IST2014-09-15T01:00:11+5:302014-09-15T01:00:11+5:30
विस्तृत करआधार हे एक मोठे आवाहन असल्याने करदात्याच्या खऱ्या उत्पन्नाचे निर्धारण करण्यासाठी आयकर अधिकाऱ्याला मदतनीस ठरणाऱ्या लेखा आणि करप्रणालीमध्ये सीएंनी तज्ज्ञ असावे,

विस्तृत करआधार मोठे आवाहन
किरण वासुदेव यांची माहिती : सीए संस्थेतर्फे चर्चासत्र
नागपूर : विस्तृत करआधार हे एक मोठे आवाहन असल्याने करदात्याच्या खऱ्या उत्पन्नाचे निर्धारण करण्यासाठी आयकर अधिकाऱ्याला मदतनीस ठरणाऱ्या लेखा आणि करप्रणालीमध्ये सीएंनी तज्ज्ञ असावे, अशी माहिती राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे संचालक आणि विदर्भ विभागाचे मुख्य आयकर आयुक्त (प्रभारी) किरण वासुदेव यांनी येथे दिली.
आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे ‘टॅक्स आॅडिट अॅण्ड डाक्युमेन्टेशन’, या विषयावर रामदासपेठेतील एक हॉटेलमध्ये नुकतेच चर्चासत्र घेण्यात आले. कर गोळा करण्यात सीए आणि विभागाचा मोठा सहभाग असतो. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असावे, असे वासुदेव यांनी स्पष्ट केले. मंचावर डब्ल्यूआयआरसीचे उपाध्यक्ष जुल्फेश शाह, आयसीएआयचे माजी अध्यक्ष जयदीप शाह, सीए नागपूर संस्थेचे अध्यक्ष अश्विनी अग्रवाल, सचिव स्वप्नील घाटे, माजी अध्यक्ष स्वप्नील अग्रवाल होते.
वासुदेव यांनी सांगितले की, देशाचा विकास आणि प्रगतीत करदात्याचे प्रमाण योग्य नसून एकूण लोकसंख्येच्या ३ ते ५ टक्के आहे. त्यामुळेच कर संग्रहण कमी होत आहे. करवाढीसाठी सीएंनी विभागाला मदत करावी. प्रसंगी विभाग करदात्यासाठी सेवा पुरवठादार बनेल. माहिती तंत्रज्ञानामुळे कर आॅडिटचा दृष्टिकोन बदलणार आहे. त्यात अनेक दृष्टीने मोठे बदल घडून येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीबीडीटीशी संबंधित रिटर्न फायलिंग करण्याच्या तारखेत वाढ करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. भारतात ही समस्या नेहमीचीच असून योग्य वेळेत ती सोडविण्यावर आपला भर राहील. आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे घेण्यात येणारे सीपीई कार्यक्रम आणि तंत्रज्ञान व न्यूजलेटर्स लर्निंगची किरण वासुदेव यांनी प्रशंसा केली.
सीए संस्थेचे अध्यक्ष अश्विनी अग्रवाल यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. चर्चासत्रात कीर्ती अग्रवाल, उमंग अग्रवाल, सुरेन दुरगकर, कीर्ती कल्याणी, जयदीप शाह, संदीप जोतवानी, औरंगाबादचे मुकेश हुंडीवाला, पुणेचे रेखा धरमकर, स्वप्नील घाटे, स्वप्नील अग्रवाल, पी.सी. सारडा, घनश्याम जोगानी, अतुल खेमका, अभय राजंदेकर, अरविंद भन्साली, सुरजीत भसीन, सचिन अग्रवाल, अंकुश देवानी, प्रियंका शर्मा, अपर्णा शंकरन् आणि ३५० पेक्षा जास्त सीए उपस्थित होते.(प्रतिनिधी)