१२ आमदारांच्या नियुक्तीवर संयम राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST2021-05-25T04:10:04+5:302021-05-25T04:10:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेतील १२ नवीन सदस्यांच्या नियुक्तीवरून राजकारण तापले आहे. शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय ...

Exercise restraint on the appointment of 12 MLAs | १२ आमदारांच्या नियुक्तीवर संयम राखा

१२ आमदारांच्या नियुक्तीवर संयम राखा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेतील १२ नवीन सदस्यांच्या नियुक्तीवरून राजकारण तापले आहे. शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी या मुद्यावरून राज्यपालांवर निशाणा साधला. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. संबंधित प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. राऊत यांनी यावर टिप्पणी करीत असताना शब्दांचा विचारपूर्वक वापर करायला हवा. राऊत यांना वादग्रस्त वक्तव्य देण्याची सवयच लागली आहे, असे फडणवीस म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विधान परिषदेतील १२ सदस्यांची नियुक्ती का झाली नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने केला आहे. राज्यपाल व राज्य शासनाला नोटीस पाठविण्यात आले आहेत. राज्यपाल कार्यालयाला त्यांची बाजू मांडायची आहे. सुनावणीनंतर न्यायालय निर्णय सुनावणार आहे. तोपर्यंत सर्वांनीच संयम ठेवला पाहिजे. परंतु राऊत वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर काहीच प्रभाव पडणार नाही. फाईल हरवली आहे, असे वक्तव्य राऊत यांना शोभत नाही, असेदेखील फडणवीस म्हणाले.

Web Title: Exercise restraint on the appointment of 12 MLAs