नागपुरातील एम्प्रेस मॉलजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 01:15 AM2020-06-05T01:15:34+5:302020-06-05T01:17:09+5:30

एम्प्रेस मिल लगतच्या निर्जन ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचा एक हात आणि एक पाय गायब असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Excitement over finding bodies near Empress Mall in Nagpur | नागपुरातील एम्प्रेस मॉलजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

नागपुरातील एम्प्रेस मॉलजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एम्प्रेस मिल लगतच्या निर्जन ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचा एक हात आणि एक पाय गायब असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
एम्प्रेस मॉल जवळचा काही भाग निर्जन असून तेथे झाडेझुडपे वाढलेली आहेत. छत्तीसगड, बालाघाटमधून आलेल्या मजुरांच्या तेथे झोपड्या होत्या. तेथे काही मजूर राहत होते. लॉकडाऊन नंतर तेथून अनेक मजूर निघून गेले. सध्या त्या भागात काही गर्दुल्ले, मद्यपी रात्रीच्या वेळी जातात, असे सांगितले जाते.
गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास एका व्यक्तीला तीव्र दुर्गंधी आल्यामुळे त्याने जवळ जाऊन बघितले असता मृतदेह पडून दिसला. त्याने ही माहिती बाजूच्या एका चौकीदाराला दिली. चौकीदाराने नियंत्रण कक्षात तर नियंत्रण कक्षाने गणेशपेठ पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती. मृत व्यक्तीचा एक हात आणि एक पाय गायब होता. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जनावरांनी चावल्याच्या खुणा होत्या, असे पोलीस सांगतात. मोकाट श्वानांनी मृतदेहाची अशी अवस्था केली असावी, असा पोलिसांनी अंदाज बांधला आहे. दरम्यान, तो कोण कुठला, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली. आजूबाजूच्यांनी मृताबाबत कसलीही माहिती दिली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही, त्या व्यक्तीची हत्या केली की तो तिथे आजाराने मरण पावला, हे कळायला मार्ग नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यासंबंधाने गुन्ह्याचे स्वरूप ठरविण्यात येईल, अशी माहिती गणेशपेठचे ठाणेदार कुमरे यांनी दिली.

Web Title: Excitement over finding bodies near Empress Mall in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.