नागपूरच्या बाजारपेठेत उत्साह, व्यापारी आनंदात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 11:04 PM2021-06-21T23:04:27+5:302021-06-21T23:05:00+5:30

अनेक दिवसानंतर सोमवारपासून शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहिली. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने शहरातील सर्वच बाजारपेठेत उत्साह दिसून आला.

Excitement in Nagpur market, merchants rejoicing |  नागपूरच्या बाजारपेठेत उत्साह, व्यापारी आनंदात

 नागपूरच्या बाजारपेठेत उत्साह, व्यापारी आनंदात

googlenewsNext
ठळक मुद्देरात्रीपर्यंत वेळ वाढविल्याचा परिणाम 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनेक दिवसानंतर सोमवारपासून शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहिली. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने शहरातील सर्वच बाजारपेठेत उत्साह दिसून आला. त्यामुळे व्यापारीही आनंदात होते. एकूणच चित्र पाहता येत्या काही दिवसात लाॅकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई निघेल, असा विश्वास व्यापाऱ्यांना वाटू लागला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात संक्रमण अनियंत्रित झाले होते. परंतु आता परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने हळूहळू निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत स्थानिक प्रशासनाने रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे सोमवारपासून बाजारपेठेतील उत्साह पुन्हा वाढल्याचे दिसून आले. हॉटेल असो की शोरुम सर्वच ठिकाणी गर्दी झाली. दरम्यान, बहुतांश व्यापारी व ग्राहकांनी मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर आदी नियमांचे पालन केले. काही लोक असेही होते ज्यांनी नियमांची अवहेलना केली. विशेषत: चहाटपरी, पानठेले, नाश्त्याची दुकाने आदींवर लोक बिनधास्त वावरत असल्याचे दिसून आले. दरम्यान, चेंबर ऑफ असाेसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड(कैमिट)चे अध्यक्ष दीपेन अग्रवाल आणि नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत, आता राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी तातडीने पॅकेजची घोषणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Excitement in Nagpur market, merchants rejoicing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.