वाडी परिसरात संविधान दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:24+5:302020-11-28T04:07:24+5:30
ग्रामपंचायत लाव्हा येथे संविधान दिनानिमित्त सरपंच ज्योत्स्ना सुजीत नितनवरे यांचे हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधानाचे ...

वाडी परिसरात संविधान दिन उत्साहात
ग्रामपंचायत लाव्हा येथे संविधान दिनानिमित्त सरपंच ज्योत्स्ना सुजीत नितनवरे यांचे हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य सुजित नितनवरे, ग्रा.पं. सदस्य पांडुरंग बोरकर, अनिल पाटील, साधना वानखेडे, सुनिता मेश्राम, सुलोचना डोंगरे, विमलकुमार डोंगरे, पुरुषोत्तम अन्नपूर्णा, जिजा लाखे, सुभाष डोईफोडे, सुनील वानखेडे, आशीर्वाद पाटील, रामकृष्णा धुर्वे, चरण धोंगडे, सूर्यवंशी पाटील, ऋषी धोंगडे, सारिका सलामे, शिला कुंभरे, हिमांशू ढवळे, समीक्षा ढोक, श्रेया महात्मे आदी उपस्थित होते. विमलताई तिडके विद्यालयात मुख्याध्यापिका साधना कोलवाडकर यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित हाेते.
....
महाराष्ट्र अंनिस शाखा रामटेक
रामटेक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रामटेकच्यावतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकातील महामानवाच्या पुतळ्यास माल्यार्पण करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. अध्यक्षस्थानी दीपा चव्हाण हाेत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शुभा थूलकर, अर्चना मेश्राम, सरला नाईक, रुस्तम माेटघरे, वेणुधर भिमटे, राहुल जाेहरे, कृपासागर भवते, रमेश कारामाेरे, प्रयास ठवरे, ओमप्रकाश डाेले, दुर्याेधन बगमारे, अमित अंबादे, प्रतीक सहारे आदी उपस्थित हाेते.