विविध संघटनांतर्फे संविधान दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:02 IST2020-11-28T04:02:59+5:302020-11-28T04:02:59+5:30
रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी ...

विविध संघटनांतर्फे संविधान दिन उत्साहात
रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे, सेवक लव्हात्रे, कमलेश मेश्राम, नरेंद्र पानतावणे, मनोज शेंडे, बबनराव बोंदाटे, डॉ. विनोद डोंगरे, पृथ्वीराज गोटे, चंद्रमणी बांबुर्डे, प्रभाकर ढोक, अमन सोनटक्के, निरंजन पाटील, अरुण गडलिंग उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र
संविधान दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पल प्रमुख माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी नगराध्यक्ष शाहजहां शफावत, बरिएमंचे जिल्हाध्यक्ष अजय कदम, दीपक सिरिया, तहसीलदार गणेश जगदाळे, मुख्याधिकारी संदीप बोरकर, पोलीस निरीक्षक संतोष बाकल, विजय मालवे, नगरसेविका सावला सिंगाडे, दिनेश स्वामी, अफजल अन्सारी, रेखा भावे, उदास बंसाेड, सुभाष सोमकुंवर, नारायण नितनवरे, मनोहर गणवीर, गणेश सेंगर, राजेश गजभिये उपस्थित होते.
इंदोरा बुद्धविहार
इंदोरा बुद्धविहार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेच्या प्रती वितरित करण्यात आल्या. यावेळी अमित गडपाले, नितीन गणवीर, विजय इंदूरकर, संदीप कोचे, भंते नागघोष नाागसेन, धम्मबाेधी, प्रज्ञाबोधी, भीमाबोधी, नागानंद, संघप्रिया, धम्मशांती, देवा रामटेके, रवी मेंढे, कालीचरण घरडे, जगन तायडे, ओम अंबादे आदी उपस्थित होते.
भीमराज की बेटी
भीमराज की बेटी या सामाजिक व सांस्कृतिक संघटनेतर्फे संविधान दिन सााजरा करण्यात आला. याावेळी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत रणजित मेश्राम, ज्येष्ठ विधिज्ञ फिरदौस मिर्झा, संपादक सुनील खोबागडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक आयुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, हर्षवर्धन कांबळे आदींनी मार्गदर्शन केले.
ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय
ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात संविधान दिन सााजरा करण्यात आला. यावेळी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. आयकर उपायुक्त क्रांती खोब्रागडे, चंदनसिंह राेटेले, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, प्रा. शालिनी तोरे, कल्पना मुकुंदे यांनी मार्गदर्शन केले.
बेझनबाग मित्र परिवार
बेझनबाग मित्र परिवारतर्फे मैत्रयी बुद्धविहार परिसरात संविधन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भगवान बुद्ध का संदेश या पुस्तकााचे नि:शुल्क वितरण करण्यात आले. यावेळी गाेपाळराव बडोले, भदंत नगाप्रकाश, नगरसेवक किशोर जिचकार, राजरत्न बंसोड, अजय निकोसे, अशोक कोल्हटकर, अनमोल टेंभुर्णे, अमोल रामटेके, राजेश रयपुरे, योगेश चव्हाण, सुनील रामटेके, सुनंदा केचे, दीप्ती नाईक, अलका लाडे, अजय वाघमारे, छाया खोब्रागडे, ममता गेडाम, बकुल वासनिक आदी उपस्थित होते.
शासकीय आयुर्वेद महािवद्यालय
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रकाश काबरा, डॉ. राजेंद्र लांबट, डॉ. लुईस जॉन, डॉ. गाेपाल शर्मा, डॉ. मनोज गायकवाड, डॉ. बोरकर, डॉ. मोजेस, डॉ. पात्रीकर, डॉ. माधुरी वाघ आदी उपस्थित होते.
नॅशनल पीपल्स सोशल ऑर्गनायझेशन
नॅशनल पीपल्स सोशल ऑर्गनायझेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने उंटखना चौक येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेश ढेंगरे, संजय मून, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, सुजाता कोंबाडे, सुधा कांबळे, गीता लुटे, विजय गायकवाड, डॉ. दिलीप सुखदेवे, गौतम ढेंगरे, अरुण साखरकर, अरुण गाडे, रवी पोथारे, डॉ. राजाभाऊ टाकसाळे, प्रशांत बन्सोड आदी उपस्थित होते.