शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हत्तीने उडविली रेल्वेस्थानकावर खळबळ, सुरक्षा यंत्रणांची धावपळ, तासभर रोखला गेला अनेकांचा श्वास 

By नरेश डोंगरे | Updated: August 13, 2022 22:37 IST

Railway Station: घातपाताच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर चोख बंदोबस्त असताना मध्यप्रदेशातून आलेल्या हत्तींनी सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. शंकाकुशंका निर्माण झाल्याने अनेकांची धाकधूक वाढली.

- नरेश डोंगरे   नागपूर - घातपाताच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर चोख बंदोबस्त असताना मध्यप्रदेशातून आलेल्या हत्तींनी सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. शंकाकुशंका निर्माण झाल्याने अनेकांची धाकधूक वाढली. त्यामुळे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या श्वानाने तब्बल तास-दोन तास कसून तपासणी केली. त्यानंतर ‘नो प्रॉब्लेम’चा निष्कर्ष काढण्यात आला अन् सुरक्षा यंत्रणेसह रेल्वचे प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच स्वातंत्र्य दिन अवघ्या काही तासांवर आला आहे. त्यामुळे सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. उपराजधानीतील गर्दीच्या सर्व ठिकाणी आणि खास करून महत्वांच्या स्थळांसह रेल्वेस्थानक, बसस्थानकावरही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संशयीत व्यक्ती आणि वस्तूंवर पोलीस नजर रोखत आहेत. या पार्श्वभूमीवर, शनिवारी सायंकाळी ५.४५ ला रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक २-३ वर एका व्यक्तीकडे असलेल्या पार्सलवर पोलिसांची नजर गेली. त्यांनी मेटल डिटेक्टरने तपासणी केली असता त्यातून वेगळाच आवाज आला. त्यामुळे पोलीस सतर्क झाले. लगेच बीडीडीएसचे पथक बोलवून घेण्यात आले. श्वानानेही डब्यात काही तरी वेगळे आहे, असे संकेत दिले. त्यामुळे तपास यंत्रणांसह रेल्वे प्रशासनातही खळबळ निर्माण झाले.

एकूण १५ डबे (पार्सल) होते आणि पंधराही डब्यातून टिक्... टिक्... असा आवाज येत असल्याने अनेकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. दरम्यान् , ही माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलीस, आरपीएफचेही वरिष्ठ फलाटावर पोहचले. सुरक्षेचे एक रिंगण तयार करण्यात आले. १५ ही डबे क्रमशा उघडण्यात आले. प्रत्येक डब्यात मेटलचा एक फुटाचा एक हत्ती होता. तास दोन तास कसून तपासणी केल्यानंतर  ‘या हत्तीकडून कसलाही धोका नसल्याचा निर्वाळा बीडीडीएसने दिला. त्यानंतर रेल्वे प्रशासन, लोहमार्ग पोलीस, आरपीएफसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.  बैतूलहून आले, मुंबईकडे गेलेसुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडवून देणारे ‘ते’ हत्ती मध्यप्रदेशातील बैतूल येथे तयार करण्यात आले होते. दक्षीण एक्सप्रेसने नागपूर स्थानकावर दुपारी पोहचले. रात्री ते दुरांतोने मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, मध्येच तपासणी झाल्याने पार्सल फोडून हत्ती बाहेर काढण्यात आले अन् सर्व गोंधळ निर्माण झाला. अखेर रात्री दुरांतो एक्सप्रेसने ते मुंबईकडे रवाना झाले.

टॅग्स :nagpurनागपूर