शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

संत्रा प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करणार : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 8:59 PM

नाशिकच्या द्राक्षांप्रमाणे नागपूरच्या संत्र्यांचादेखील दर्जा जागतिक पातळीचा आहे. द्राक्ष प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करण्यात आले आहे. विदर्भात जर संत्रा प्रक्रिया प्रकल्प आला तर द्राक्षांप्रमाणे या प्रकल्पांचेदेखील उत्पादन शुल्क माफ करण्यात येईल व ही शुल्कमाफी २०२५ सालापर्यंत असेल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा, उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चा सोमवारी थाटात समारोप झाला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

ठळक मुद्दे‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चा थाटात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाशिकच्या द्राक्षांप्रमाणे नागपूरच्या संत्र्यांचादेखील दर्जा जागतिक पातळीचा आहे. द्राक्ष प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करण्यात आले आहे. विदर्भात जर संत्रा प्रक्रिया प्रकल्प आला तर द्राक्षांप्रमाणे या प्रकल्पांचेदेखील उत्पादन शुल्क माफ करण्यात येईल व ही शुल्कमाफी २०२५ सालापर्यंत असेल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा, उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चा सोमवारी थाटात समारोप झाला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.रेशीमबाग मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित,‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, ‘ऑरेंज ग्रोव्हर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष पी. जी.जगदीश, सचिव हरजिंदरसिंह मान,‘आयसीएआर-सीसीआरआय’चे ( सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालक डॉ. एम. एस. लदानिया प्रामुख्याने उपस्थित होते. मागील ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चित वाढ झाली व येथील मार्गदर्शनामुळे नैसर्गिक संकटांपासून पीकदेखील वाचविता आले. द्राक्ष उत्पादक कंपन्या संत्र्यावरदेखील प्रक्रिया करणारे उद्योग विदर्भात टाकण्याच्या विचारात आहेत. संत्र्याच्या ‘पल्प’पासून विविध उत्पादन तयार करून त्यांची निर्यात करण्यात येईल. ‘लोकमत’ने आता विदर्भात संत्रा प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. या प्रकल्पाबाबत तीन महिन्यांत प्रस्ताव दिला तर सर्वात जास्त विजेची ‘सबसिडी’देखील देण्यात येईल व मोफत सौर ऊर्जादेखील देण्यात येईल. सोबतच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संत्रा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष निधीचीदेखील तरतूद करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. जोपर्यंत देशातील शेतकरी मजबूत होणार नाही तोपर्यंत देश आणि अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकणार नाही.‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’ हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिशा दाखविणारा ठरला आहे, असे प्रतिपादन विजय दर्डा यांनी केले.यावेळी संत्रा प्रक्रिया उद्योग व शेतीमध्ये मौलिक योगदान देणारे वैज्ञानिक, संस्था व प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. ‘लोकमत’चे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी प्रास्ताविक केले. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’ची ‘कॅबिनेट’मध्ये चर्चा‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मुळे संपूर्ण जगाचे लक्ष नागपूरकडे वेधल्या गेले. राज्यात अनेक महोत्सव साजरे होतात. मात्र प्रथमच एखाद्या महोत्सवाची मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व याला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेदेखील याला समर्थन मिळाले. विजय दर्डा यांच्या पुढाकारामुळे हे होऊ शकले, असे कौतुकोद्गार बावनकुळे यांनी काढलेयांचा झाला गौरवप्रगतिशील शेतकरी

  • रमेश जिचकार, अमरावती
  • प्रमोद बाळासाहेब पाटील, संचालक, श्रमजीवी संत्रा उत्पादक संस्था
  • प्रमोद तिजारे, काटोल
  • प्रकाश दवाते, सेंदुरघाट, अमरावती
  • मनोज पेलघडे, खामगाव
  • मनोज जवंजाळ

संस्था‘ऑरेंज ग्रोव्हर्स असोसिएशन ऑफ इंडिया’

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे