बदल्यांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ
By Admin | Updated: June 10, 2014 01:05 IST2014-06-10T01:05:01+5:302014-06-10T01:05:01+5:30
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांना देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. उर्वरित बदल्यांच्या प्रक्रियेला

बदल्यांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ
जिल्हा परिषद : कर्मचार्यांच्या बदल्यांवरील बंदी उठविली
नागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांना देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. उर्वरित बदल्यांच्या प्रक्रियेला २१ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार जि.प. कर्मचार्यांच्या जिल्हास्तरावर १७ ते २४ मे दरम्यान समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार १७ मे पासून जि.प.च्या आबासाहेब खेडकर सभागृहात ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात महिला व बालकल्याण, कृषी, बांधकाम, सामान्य प्रशासन, आरोग्य व पंचायत विभागातील कर्मचार्यांचे समुपदेशन घेण्यात आले.
२१ मे रोजी शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील आचारसंहिता लागल्याने २२ मे पासून बदल्यांच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे मुख्य निवडणूक अधिकार्यांचे मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत जि.प. कर्मचार्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा, लघुसिंचन व चतुर्थo्रेणी कर्मचार्यांची बदल्यांची प्रक्रिया थाबंविण्यात आली होती. आता या विभागातील समुपदेशन प्रक्रि या २१ रोजी राबविण्यात येणार आहे. ज्या कर्मचार्यांचे बदल्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. अशा कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.