रुग्णांकडून जादा वसुली; बिल तपासण्याची मोहीम संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:05 IST2021-03-29T04:05:47+5:302021-03-29T04:05:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संसर्ग वाढल्याने रुग्णांना भरती होण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासकीय रुग्णालयात बेड ...

Excess recovery from patients; Bill check campaign slow | रुग्णांकडून जादा वसुली; बिल तपासण्याची मोहीम संथ

रुग्णांकडून जादा वसुली; बिल तपासण्याची मोहीम संथ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संसर्ग वाढल्याने रुग्णांना भरती होण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध नाही. खासगी रुग्णालयांत रुग्णांकडून जादा वसुली सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. कोरोना रुग्णांकडून जादा बिल वसुली केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने गेल्या वर्षी महापालिकेने ऑडिटर्सची नियुक्ती केली होती. यामुळे काही प्रमाणात बिल वसुलीला आळा बसला होता. सध्या ऑडिटर्स आहेत. पण खासगी रुग्णालयांचे बिल तपासण्याची मोहीम संथ पडली आहे.

शहरात शासकीय रुग्णालयात १५१५ बेड तर खासगी रुग्णालात एकूण २९३६ बेड आहेत. असे एकूण ४४५१ बेड आहेत. यातील जवळपास ८००बेड उपलब्ध आहेत. वाढत्या रुग्णांमुळे बेडसाठी रुग्णांची धावाधाव सुरू आहे. काही पैसेवाल्यांनी आधीच बुकिंग करून ठेवल्याची माहिती आहे. जो अधिक पैसे देईल त्याला बेड उपलब्ध होईल. अशी अनेक खासगी रुग्णालयांची भूमिका आहे.

होम आयसोलेनशमधील रुग्ण अनेक रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचीही तारांबळ उडत आहे. गंभीर अवस्थेत रुग्णांना भरती करण्यासाठी रुग्णालयांकडून जादा बिलाची मागणी केली जाते. अ‍ॅडव्हान्स जमा केल्याशिवाय भरती करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

खासगीकडून होणारी लूट टाळण्यासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. आकस्मिक भेटी देऊन रुग्णालयांची तपासणी करणे अपेक्षित आहे. अनेक रुग्णांना वैद्यकीय विमा लागू असतानाही जादाची आकारणी करून लुटले जात असल्याची ओरड आहे. त्यामुळे मनपाकडे असलेल्या अधिकाराबद्दलही अनेकांनी शंका व्यक्त केली. यासंदर्भात जलज शर्मा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर बिल तपासण्यासाठी ऑडिटर्स नियुक्त केले असल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

.......

ऑन द स्पॉट तपासणी आवश्यक

मनपाने कुठल्याही करोनाबाधिताची लुबाडणूक होऊ नये म्हणून अधिग्रहित खासगी रुग्णालयात ऑडिटर बसविला. रुग्णाला सुटी होण्यापूर्वी जादाची देयके आल्यास ती त्यांनी ऑन द स्पॉट तपासून घेणे आवश्यक आहे. मात्र, काही रुग्णालयांतील ऑडिटर्स असहकार्य करीत असल्याच्या तक्रारी आहेत. तर, काहींना रुग्णालयांतील देयकांची शुल्क आकारणीच समजत नसल्याची बाब पुढे आली आहे.

Web Title: Excess recovery from patients; Bill check campaign slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.