शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाचा अजब कारभार; परीक्षार्थींना मिळाली जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 10:51 IST

सूत्रांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविण्याचे हे तिसरे प्रकरण आहे. यापूर्वी साेशल वर्कच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षार्थींना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली हाेती.

ठळक मुद्देबीकाॅम चाैथ्या सेमिस्टरच्या मराठी विषयाचे प्रकरण : तासभर गोंधळ

आशिष दुबे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत पुन्हा गाेंधळ झाल्याचे समाेर आले. शुक्रवारी बीकाॅम चाैथ्या सेमिस्टरच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार झाला. नवीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. धक्कादायक म्हणजे विद्यार्थी किमान तासभर तरी प्रश्नपत्रिका साेडविण्यासाठी डाेके लावत हाेते. नंतर लक्षात आले की, ही प्रश्नपत्रिकाच अभ्यासक्रमाच्या बाहेरची आहे.

शुक्रवारी बीकाॅम चाैथ्या सेमिस्टरच्या मराठी विषयाचा पेपर हाेता. सूत्रांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना नव्याऐवजी जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. यातील सर्व प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना याबाबत माहिती दिली व संपूर्ण गाेंधळ लक्षात आला. विद्यापीठाच्यापरीक्षा विभागानेच या प्रश्नपत्रिकेची लिंक काॅलेजला पाठविली हाेती व काॅलेजने ती डाऊनलाेड केली. परीक्षा विभागाला याबाबत सूचित केल्यानंतर त्यांनी नवीन लिंक पाठविली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका साेडवायला सुरुवात केली. एक ते दीड तास हा संपूर्ण गाेंधळ चालला. सूत्रांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविण्याचे हे तिसरे प्रकरण आहे. यापूर्वी साेशल वर्कच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षार्थींना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली हाेती.

परीक्षा विभागाची चूक नाही

याबाबत संपर्क साधला असता विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे यांनी ही परीक्षा विभागाची चूक नसल्याचे सांगितले. शुक्रवारी जुन्या व नव्या अशा दाेन्ही अभ्यासक्रमाचे पेपर हाेते. काही महाविद्यालयांनी नवीन अभ्यासक्रमाची लिंक ओपन करण्याऐवजी जुन्या अभ्यासक्रमाची लिंक डाऊनलाेड केल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महाविद्यालयांना त्वरित नव्या अभ्यासक्रमाची लिंक पाठविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठuniversityविद्यापीठ