शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम हटाव, देश बचाव : वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 21:33 IST

ईव्हीएम मशीन या पारदर्शी नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेली मते, यात बरीच तफावत आढळून आली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन या देशाच्या लोकशाहीसाठी घातक असून, त्या निवडणूक प्रक्रियेतून तात्काळ हटवण्यात याव्यात आणि बॅलेट पेपरनेच मतदान घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघातर्फे करण्यात आली आहे. ईव्हीएम हटाव, देश बचाव असा नारा देत सोमवारी राज्यभरात घंटानाद करण्यात आला. नागपुरात संविधान चौक येथे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देबॅलेट पेपरनेच निवडणुका घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएम मशीन या पारदर्शी नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेली मते, यात बरीच तफावत आढळून आली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन या देशाच्या लोकशाहीसाठी घातक असून, त्या निवडणूक प्रक्रियेतून तात्काळ हटवण्यात याव्यात आणि बॅलेट पेपरनेच मतदान घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघातर्फे करण्यात आली आहे. ईव्हीएम हटाव, देश बचाव असा नारा देत सोमवारी राज्यभरात घंटानाद करण्यात आला. नागपुरात संविधान चौक येथे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.यावेळी रवी शेंडे यांनी सांगितले की, ईव्हीएमबाबत आधीपासूनच संशय आहे. लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात ईव्हीएममध्ये गडबड दिसून आली. झालेल्या मतदानाच्या तुलनेत मोजण्यात आलेल्या मतांची संख्या अधिक आढळून आली. याबाबत निवडणूक आयोगाने मौन धारण केले आहे. आयोगाच्या धोरणामुळे लोकांच्या मतांची चोरी होत आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, तेव्हा त्यांनी यावर तातडीने कारवाई करावी. याबाबत आमचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांना काही प्रश्न विचारले आहे. येत्या १५ दिवसात निवडणूक आयोगाने या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांवर आंदोलन करण्यात आल्याचेही शेंडे यांनी सांगितले.यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात घोषणा देत ती हटविण्याची मागणी लावून धरली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले.या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, प्रदेश महासचिव सागर डबरासे, मिलिंद मेश्राम, अरुण फुलझेले, भाऊराव सोनपिंपळे, अनिता मेश्राम, नालंदा गणवीर, कांचन देवगडे, समिता नंदेश्वर, गोवर्धन बेळे, हरीश नारनवरे, संजय सूर्यवंशी, रमेश कांबळे, अंकुश मोहिले, देवेंद्र मेश्राम, गौतम पाटील, प्रिन्स गवई आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी