स्वच्छ भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे

By Admin | Updated: November 10, 2014 01:00 IST2014-11-10T01:00:13+5:302014-11-10T01:00:13+5:30

आरोग्यदायी वातावरणासाठी कार्यालय तसेच परिसर स्वच्छतेसोबतच आपले गाव व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी देशव्यापी स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हावे,

Everyone should be involved in clean India campaign | स्वच्छ भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे

स्वच्छ भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे

जिल्हा परिषद : शिवाजी जोंधळे यांचे आवाहन
नागपूर : आरोग्यदायी वातावरणासाठी कार्यालय तसेच परिसर स्वच्छतेसोबतच आपले गाव व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी देशव्यापी स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
स्वच्छ भारत अभियान संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जि.प.च्या जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जि.प. प्रांगणात नुकतेच श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जोंधळे बोलत होते. आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासह जि.प.चे अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभागी झाले होते.
श्रमदान मोहिमेंतर्गत जि.प.च्या सर्व विभागाची कार्यालयीन स्वच्छता करण्यात आली. याची पाहणी जोंधळे यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, पंचायत विभागाचे वासुदेव भांडारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई आदींनी केली.
स्वच्छ भारत मिशनतर्फे श्रमदान मोहीम त्रिस्तरीय पंचायत राज संस्था, सर्व शासकीय, निमशासकीय स्तरावर राबविण्यात येत आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एक वेळा किमान दोन तास श्रमदान करणे अपेक्षित आहे. या दृष्टीने जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्र वारी तसेच तिसऱ्या व पाचव्या शनिवारी दुपारी ३.३०ते ५.३० या कालावधीत श्रमदान मोहीम जि.प.मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. महिन्याच्या पहिल्या शनिवारी सामूहिक स्वरूपात जि.प.इमारत व परिसर स्वच्छता आणि इतर नियोजित दिवशी प्रत्येक विभागाला आपल्या कार्यालयाची स्वच्छता करावी लागणार आहे.
पंचायत समिती स्तरावर दर शुक्र वारी ३.३० ते ५.३० या कालावधीत श्रमदान कार्यक्र माचे आयोजन गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना या कार्यक्र मात सहभागी करून अंमलबजावणी करावयाची आहे.
सामाजिक संघटना, खासगी शैक्षणिक संस्था, खासगी उपक्र म व व्यावसायिक यांचाही यात सहभाग राहणार आहे. या कार्यक्र मासाठी जि.प.च्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे विक्र ांत इंगळे, दिलीप वझलवार, भूपेश मेहर, निखील रोंदळकर, दिनेश मासोदकर, राजेश चौधरी, आशीष रावळे, अविनाश हुमणे, महेश जाचक, राधा रहांगडाले, चैताली देशमुख, अंजली पाटणकर, मिलिंद मेश्राम आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Everyone should be involved in clean India campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.