शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाला आपल्या रितीरिवाजांप्रमाणे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य

By योगेश पांडे | Updated: June 3, 2025 18:27 IST

नितेश राणेंच्या व्हर्चुअल ईदच्या वक्तव्यावर कार्यकारी प्रदेशाध्यक्षांची भूमिका : आणीबाणीविरोधात राज्यभरात पाळणार काळा दिवस

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंत्री नितेश राणे यांनी व्हर्चुअल ईदसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. या मुद्द्यावर भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सावध प्रतिक्रिया दिली. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्म-पंथाच्या परंपरा व रितीरिवाजांप्रमाणे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य आहे हीच भाजपची भूमिका असल्याचे प्रतिपादन चव्हाण यांनी केले. नागपुरात भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यशाळेनंतर आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला. त्याबाबत चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळले. तसेच राणे यांच्याविरोधात कारवाई करण्याबाबतदेखील त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, विदर्भ विभागीय कार्यशाळेबाबत त्यांना माहिती दिली. भाजपकडून देशभरात संघटन पर्वाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा आता अंतिम टप्पा आहे. राज्यातील ८० संघटनात्मक जिल्ह्यात नेमणूका झालेल्या आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या योजना तसेच केलेली महत्त्वाची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करणार आहेत. पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने एक झाड मातृभूमीच्या नावाने लावण्याचे जनतेला आवाहन करण्यात येणार आहे. तसेच कॉंग्रेसने लावलेल्या आणीबाणीविरोधात २५ जून रोजी काळा दिवस पाळण्यात येणार आहे. कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली होती व त्याची आठवण जनतेला या माध्यमातून करून देण्यात येईल. केंद्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी त्यांची भूमिका मांडल्यावर राज्य तसेच जिल्हा पातळीवर कार्यक्रम घेण्यात येतील, असे चव्हाण यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या माध्यमातून जनसंपर्क२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपकडून जनसंपर्क राबविण्यात येईल. प्रत्येक मंडळात दोन कार्यक्रम आयोजित करून व्याख्याने व इतर उपक्रम घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Bakri Eidबकरी ईदnagpurनागपूर