सावित्रीचे ऋण प्रत्येक स्त्रीने जपावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:33+5:302021-01-04T04:07:33+5:30

() नागपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्रीवर सावित्रीचे ऋण आहे. ...

Every woman should take care of Savitri's debt | सावित्रीचे ऋण प्रत्येक स्त्रीने जपावे

सावित्रीचे ऋण प्रत्येक स्त्रीने जपावे

()

नागपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्रीवर सावित्रीचे ऋण आहे. त्यामुळे तिने स्वत: ला व समाजाला शिक्षित करावे, अशी भावना महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांनी व्यक्त केली.

महिला व बाल कल्याण विभागातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सभापती भारती पाटील, नेमावली माटे व जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे उपस्थित होते. यावेळी पोषण अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संगीता चंद्रिकापुरे, प्रतिमा कावळे, प्रियंका जाधव, कल्पना गजभिये, सुनिता ढाकणे, मनिषा भुरचुंडी, अरुणा नेऊल, साधना राऊत, वैशाली भोयर, ताई सयाम, संगीता वासनिक, तारा बुराडे, नंदा गजबे, जयश्री तेलमासरे, माया बाभरे, रुपाली बिडकर, रुक्मिणी जंगीलवार, अनिता रामटेके, सोनाली पुराणिक या पर्यवेक्षिकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कोरोना योद्धा म्हणून माधुरी काटोके, कांता मेश्राम, वीणा शेंडे, गीता निकालजी, श्रद्धा मेनघरे, हेमलता पाटील, संगीता इटनकर, मंदा कपाळे, संगीता बोरकर, वनिता काळमेघ, माला सहस्त्रबुद्धे, पुष्पा राऊत, कीर्ती टाकळखेडे या सेविका व मदतनिसांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Every woman should take care of Savitri's debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.