शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक व्यक्ती शासन यंत्रणेपेक्षा श्रेष्ठ : शारदा साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:21 IST

देशाची शासन यंत्रणा, न्याययंत्रणा मूठभर लोकांच्या हातात आहे. येथे कायदा करण्यासाठी, झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कायदा रद्द करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. त्यामुळे एवढी मोठी यंत्रणा उपलब्ध आहे म्हणून निश्चिंत राहणे योग्य नाही. कारण ही यंत्रणा आपण निर्माण केली असून त्यास वळण लावण्याची जबाबदारीही आपलीच आहे. प्रत्येक व्यक्ती शासन यंत्रणेपेक्षा श्रेष्ठ असतो, असे मनोगत मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसी.मो. झाडे फाऊंडेशनच्या पुरस्कारांचे थाटात वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाची शासन यंत्रणा, न्याययंत्रणा मूठभर लोकांच्या हातात आहे. येथे कायदा करण्यासाठी, झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कायदा रद्द करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. त्यामुळे एवढी मोठी यंत्रणा उपलब्ध आहे म्हणून निश्चिंत राहणे योग्य नाही. कारण ही यंत्रणा आपण निर्माण केली असून त्यास वळण लावण्याची जबाबदारीही आपलीच आहे. प्रत्येक व्यक्ती शासन यंत्रणेपेक्षा श्रेष्ठ असतो, असे मनोगत मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी व्यक्त केले.सी. मो. फाऊंडेशनच्यावतीने विविध पाच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विनोबा विचार केंद्रात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे होत्या. फाऊंडेशनच्या सचिव भारती झाडे, प्रा. सुषमा कल्लावार, सावनेरच्या मूकबधिर विद्यालयाच्या प्राचार्य मंगला समर्थ व्यासपीठावर होत्या. यावेळी सी. मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार लोकमतच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय फाऊंडेशनतर्फे डॉ. गोविंद समर्थ अपंग सेवाकार्य पुरस्कार कल्याणी ढोले, मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, ना. बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. जयश्री कापसे-गावंडे, , डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्कार प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शारदा साठे पुढे म्हणाल्या, आपला समाज व देश ईश्वर किंवा शासन यंत्रणेवर नाही तर कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता सातत्याने समाज सेवेचे काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांमुळे टिकून आहे. चांगला समाज, चांगला देश घडविण्यासाठी प्रत्येकाने समाजातील हिंसाचार, धार्मिक द्वेष, जातीयवादाला मूठमाती देण्याची गरज आहे. निसर्गाकडून मिळालेला हा जन्म माणसांच्या सत्कार्यी लावण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.लीलाताई चितळे यांनी, भूकेने तान्हुले मरतील, अशी व्यवस्था नको, असा उद्वेग व्यक्त केला. देशातील चार व्यवस्था बेकाम होत असून एक व्यवस्था मनमानी करीत आहे. ही अव्यवस्था दूर करण्यासाठी प्रत्येकाने उभे राहणे गरजेचे आहे. आज देशाचे स्वातंत्र्य गोंधळात असून ही अवस्था पाहून एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून मन उदास होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.समाज व सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले तर निर्भयता निर्माण होईल व कोणतीही सत्ता ही समाजव्यवस्था बिघडविण्याचे धाडस करणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना सविता देव-हरकरे यांनी पुरस्काराची राशी गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राला देण्याचे जाहीर केले. प्रास्ताविक फाऊंडेशनच्या सचिव भारती झाडे यांनी केले. संचालन दुर्गा समर्थ यांनी केले व मंगला समर्थ यांनी आभार मानले.

 

टॅग्स :nagpurनागपूरSocialसामाजिक