कधी स्वीकारले, कधी नाकारले

By Admin | Updated: September 5, 2014 01:10 IST2014-09-05T01:10:55+5:302014-09-05T01:10:55+5:30

१९६२ पासूनच्या विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकली तर पारंपरिक राजकीय पक्षातील दिग्गजांना धक्के देत मतदारांनी अपक्षांना संधी दिली. त्याचप्रमाणे चक्क पाच निवडणुकांमध्ये त्यांना

Ever accepted, never denied | कधी स्वीकारले, कधी नाकारले

कधी स्वीकारले, कधी नाकारले

विधानसभेत अपक्षांनी दिले : प्रस्थापितांना धक्के
नागपूर : १९६२ पासूनच्या विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकली तर पारंपरिक राजकीय पक्षातील दिग्गजांना धक्के देत मतदारांनी अपक्षांना संधी दिली. त्याचप्रमाणे चक्क पाच निवडणुकांमध्ये त्यांना नाकारलेसुद्धा. त्यामुळे आगामी निवडणुकीत अपक्षांचे काय होईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
१९६२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरातील तीनपैकी दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. नागपूर-१ मधून विनायक सखाराम दांडेकर या अपक्ष उमेदवाराने काँग्रेसचे मदनगोपाल अग्रवाल यांचा पराभव केला होता. तर नागपूर-२ या मतदारसंघातून धोंडबाजी हेडाऊ यांनी काँग्रेसचे प्रतापसिंह लक्ष्मणराव भोसले यांचा पराभव केला होता. नागपूर-३ मधून रिपाइंचे डी.पी. मेश्राम विजयी झाले होते. बाकी सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते.
१९६७ मध्ये काटेलमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती. जे.एस. चांडक यांनी काँग्रेसचे नेते एस.डी. गेडाम यांना पराभूत करून विजयश्री प्राप्त केली होती. जिल्ह्यातील दहापैकी ९ जागा काँग्रेसने जिंकल्या.
१९७२ ते १९९० या दरम्यान विधानसभेच्या एकूण पाच निवडणुका झाल्या. पण जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात अपक्षांना बाजी मारता आली नाही.
१९९५ ची निवडणूक अपक्षांसाठी सुवर्णकाळ ठरली. जिल्ह्यातून पाच उमेदवार विजयी झाले. त्यानंतर १९९९ मध्ये उमरेडमधून वसंत इटकेलवार यांना संधी मिळाली तर २००४ च्या निवडणुकीत सुनील केदार अपक्ष म्हणून लढले आणि विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीतही अपक्षांच्या पदरी पराभवच आला. आता २०१४ ची निवडणूक आहे. त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्रात भाजप आघाडीला संपूर्ण बहुमत दिले. त्यामुळे अपक्षांचे महत्त्व कमी झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही युती आणि आघाडी संपूर्ण बहुमतासाठीच प्रयत्न करणार असली तरी दोन्ही बाजूने काही अपक्षही पेरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जनता यंदा अपक्षांना किती महत्त्व देते हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ever accepted, never denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.