शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अखेर त्यांनी थाटली भाज्यांची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 22:11 IST

कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत.

ठळक मुद्देभाजीविक्रेत्यांची पूर्वीपेक्षा दुप्पट गर्दी : कोरोना नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. संबंधित विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता सुरू झालेल्या या दुकानांवर प्रशासनाच्या सूचनांचे पालन होत नसल्याने कोरोनाचा धोका आणखीच वाढला आहे.पूर्वीच्या तुलनेत अशी दुकाने दुप्पट झाली आहेत. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी बेरोजगारांनी ही पावले उचलली असली तरी संकटकाळात त्यांच्यावर शासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पुढे आली आहे.मनपा आयुक्तांनी मुख्य बाजार बंद करून शहराच्या विविध भागात सुरू केलेले भाजीबाजार आता बंद झाले आहेत. त्या बाजारातील विक्रेत्यांनी खुल्या जागेवर भाजी आणि फळांची दुकाने थाटली आहे. नंदनवन, जगनाडे चौक, महाल, झेंडा चौक, सक्करदरा, दिघोरी या भागात मोकळ्या जागेवर दुकाने सुरू आहेत. एवढेच नव्हे तर त्यातील अनेकजण पहिल्यांदाच भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सदर प्रतिनिधीने या सर्व दुकानांची पाहणी केली असता या सर्व दुकानदारांनी प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. पण या दुकानांवर सॅनिटायझरची व्यवस्था दिसून आली.सक्करदरा परिसरातील सोमवारी क्वॉर्टर येथील बाजार बंद केल्यानंतरही भाजीविक्रेत्यांनी क्रीडा चौकात दुकाने सुरू केली आहेत. नंदनवन मार्गावरही अनेकांनी दुकाने लावली आहेत. अनेकजण कळमन्यात भाज्यांची विक्री न करता नंदनवन मार्गावर गाड्या लावून भाज्यांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. तिरंगा चौक, गुरुदेवनगर, नंदनवन ते हसनबाग मार्ग, उमरेड रोड, दिघोरी, मोठा ताजबाग, म्हाळगीनगर, हुडकेश्वर, मानेवाडा, बेसा, नरेंद्रनगर, खामला, जयताळा, हिंगणा रोड या परिसरातील प्रमुख मार्गांवर भाजी विक्रेत्यांची गर्दी वाढली आहे.तर वाढू शकतात रुग्ण!कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. मात्र असे विक्रेते नियमांचे उल्लंघन करून प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. या विक्रेत्यांकडे नागरिक मास्क न लावता खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या अशा निष्काळजीपणामुळे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत आहे. याकरिता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे काही नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार