अखेर वाडीला नगर परिषदेचा दर्जा
By Admin | Updated: August 26, 2014 01:05 IST2014-08-26T01:05:40+5:302014-08-26T01:05:40+5:30
बहुप्रतीक्षित वाडी ग्रामपंचायतला अखेर नगर परिषदेचा दर्जा मिळाला. याबाबतचा आज, सोमवारी अंतिम अधिसूचना जारी झाली. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना अखेर ‘ब्रेक’ मिळाला असून, विकासाला गती मिळेल.

अखेर वाडीला नगर परिषदेचा दर्जा
अंतिम अधिसूचना जारी : काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
वाडी : बहुप्रतीक्षित वाडी ग्रामपंचायतला अखेर नगर परिषदेचा दर्जा मिळाला. याबाबतचा आज, सोमवारी अंतिम अधिसूचना जारी झाली. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना अखेर ‘ब्रेक’ मिळाला असून, विकासाला गती मिळेल. शासनाचा आदेश धडकताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाडीत जल्लोष केला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमदेवाराच्या प्रचारासाठी वाडी येथे आले असता त्यांनी वाडीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यासाठी माजी मंत्री मुकुल वासनिक यांनीही सतत पाठपुरावा केला. त्यानंतर याबाबत पहिली अधिसूचना, दुसरी अधिसूचना निघून यावर आक्षेप मागविण्यात आले. दरम्यान, आचारसंहिता लागल्याने यावरील अंतिम अधिसूचना निघू शकली नाही. बरेच दिवस होऊनही वाडी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा न मिळाल्याने विरोधकांनी ‘आश्वासन हवेत विरले’ असा सूर आवळला होता. मात्र आज निघालेल्या अधिसूचनेने सर्व चर्चांना विराम मिळाला.
शासनाचा आदेश धडकताच वाडी ग्रामपंचायत सचिवालयासमोर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, काँग्रेस नेते नाना गावंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रणिता कडू यांच्या नेतृत्वात ढोलताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य भारती पाटील, प्रमिला पवार, माजी सरपंच बेबी ढबाले, भीमराव कडू, अनिल पाटील, गोविंद रोडे, वसंता इखनकर, निशांत परबत, चंद्रशेखर येवले, संगीता फ्रान्सिस, छाया डोंगरे, ज्ञानेश्वर गावंडे, गौतम तिरपुडे, नरेंद्र आमदरे, राजू मिश्रा, महेश चोखांद्रे, देवराव कडू, सुजित अधिकारी, असलम खान, बंडू गजभिये, रॉबिन शेलारे, शशिकांत देठे, विष्णू आदमने, मंगेश भड, रमेश चतुर्वेदी, संजय जीवनकर, भीमराव कांबळे, मनोज फुले, अरविंद उमप, अशोक ढोके, वासुदेव वर्मा, इंदू देवासे, आनंद इंगोले, दशरथ वांगे, नलिनी धोटेकर, अनिता रावलकर, वर्षा मेश्राम, शोभा वाटकर, पद्मा तल्हार, सीमा धुमाळ, शारदा ढोणे, नितीन कोहपरे, नामदेव चवने, श्याम कुलरकर, दीपक कडू, हरिदास इंगळे, रेखा रोडे, रामभाऊ गुडधे यांच्यासह इतर कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते. या आदेशामुळे वाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि वाडी ग्रामपंचायतच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. (प्रतिनिधी)