नांद येथे ‘सेवा दिवस’निमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST2021-07-07T04:09:50+5:302021-07-07T04:09:50+5:30
नांद : लुपिन ह्युमन वेल्फेअर ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन, नागपूरच्या वतीने ‘सेवा दिवस’निमित्त नांद (ता. भिवापूर) येथे कार्यक्रमाचे आयाेजन ...

नांद येथे ‘सेवा दिवस’निमित्त कार्यक्रम
नांद : लुपिन ह्युमन वेल्फेअर ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन, नागपूरच्या वतीने ‘सेवा दिवस’निमित्त नांद (ता. भिवापूर) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात विविध उपक्रम राबविण्यात आले.
लुपिनचे संस्थापक डॉ. देशबंधू गुप्ता यांचा स्मृतिदिन हा सेवा दिवस म्हणून साजरा केला जाताे. यावेळी झमकोली टेकडी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शिवाय, तिथे वृक्षरोपण करून राेपट्यांच्या संगाेपनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मास्क व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. महालगाव येथे काेराेना प्रतिबंधक लसीकरणाबाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. भिवापूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. कवडशी बरड येथे काेराेना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयाेजन केले हाेते. येथे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मास्क व बिस्किटांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांमध्ये लुपिन फऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक अनुप देशमुख, शिल्पा गुरडवार, राजेश मल्लेवार, रवींद्र पटले, नांद प्राथमिक आरेग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक सहभागी झाले हाेते.
050721\img-20210702-wa0110.jpg
सेवा दिवस