एक शाम यादों के नाम...

By Admin | Updated: September 23, 2014 01:05 IST2014-09-23T01:05:37+5:302014-09-23T01:05:37+5:30

एखादी व्यक्ती आपल्या लोकांमधून निघून गेली तरी स्मृतींच्या माध्यमातून ती कायमस्वरूपी जिवंत असते. संगीताच्या निरनिराळ्या स्वरांप्रमाणे या स्मृतींमधूनदेखील निरनिराळे भाव निर्माण होत असतात.

An evening memories name ... | एक शाम यादों के नाम...

एक शाम यादों के नाम...

‘श्रुतीगंध’मध्ये बहरले शास्त्रीय संगीतांचे स्वर : अरुण बांगरे यांना स्वरांजली
नागपूर : एखादी व्यक्ती आपल्या लोकांमधून निघून गेली तरी स्मृतींच्या माध्यमातून ती कायमस्वरूपी जिवंत असते. संगीताच्या निरनिराळ्या स्वरांप्रमाणे या स्मृतींमधूनदेखील निरनिराळे भाव निर्माण होत असतात. अगदी हाच अनुभव सोमवारी नामवंत संगीततज्ज्ञ डॉ.अरुण बांगरे यांना स्वरांजली देण्यासाठी आयोजित ‘श्रुतीगंध’ या संगीत कार्यक्रमात रसिकांना आला. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात बांगलादेश येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक स्वर्णोमय चक्रबर्ती तसेच कोलकाता येथील तबलावादक शुभेन्दु दास व श्रुती पाठक दास हे प्रामुख्याने सहभागी झाले होते.
स्वर्णोमय चक्रबर्ती यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने ‘श्रुतीगंध’ची सुरुवात झाली. निरनिराळ्या रागांच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. त्यानंतर शुभेन्दु दास व श्रुती पाठक दास या दाम्पत्याने तबलावादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जुगलबंदीला तर रसिकांनी भरभरून दाद दिली. यावेळी हार्मोनियम वादक देबाशिष अधिकारी, तानपुरा वादक अनुराग लाडसे व कपिल रहाटकर यांनी तालसंगत साथ दिली.ह्ण
नीरजा वाघ यांच्या पुढाकारातून या स्वरांजलीचे आयोजन करण्यात आले होते. राज चौधरी यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)

Web Title: An evening memories name ...