‘फ्युजन म्युझिक’ रंगलेली सायंकाळ

By Admin | Updated: June 9, 2014 01:20 IST2014-06-09T01:20:11+5:302014-06-09T01:20:11+5:30

कलावंतांच्या हृदयात संगीत कायम असते. मनाची प्रसन्नता गडद झाली की ते मधुरतेने गायकांच्या ओठांवर येते. वादकांच्या सुरेल वादनाने त्याला साज चढतो. अशाच नवोदित जवळपास १00

The evening of 'Fusion music' | ‘फ्युजन म्युझिक’ रंगलेली सायंकाळ

‘फ्युजन म्युझिक’ रंगलेली सायंकाळ

अँम्बियन्स बँड : कलावंताचे तयारीचे सादरीकरण
नागपूर : कलावंतांच्या हृदयात संगीत कायम असते. मनाची प्रसन्नता गडद झाली की ते मधुरतेने गायकांच्या ओठांवर येते. वादकांच्या सुरेल वादनाने  त्याला साज चढतो. अशाच नवोदित जवळपास १00 बाल-युवा गायक-वादक कलावंतांच्या फ्युजन म्युझिकच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक  सभागृहात करण्यात आले.
अँम्बियन्स बँडतर्फे नागपुरातील ५0 गिटारिस्ट, २0 गायक आणि २0 तबलावादक तसेच सिंथेसायझर, वेस्टर्न ड्रमसेट व मायनर वादकांनी भारतीय  शास्त्रीय संगीतातील रागांसह हिंदी - मराठी लोकप्रिय गीतांचे पाश्‍चात्त्य सुरावटींसह केलेल्या सादरीकरणाने रसिकांना जिंकले. या कार्यक्रमाची  संकल्पना व मार्गदर्शन कांचन चारभाई व राकेश वानखेडे यांचे होते. नव्या पिढीला संगीताची गोडी लागावी व त्यांनी संगीताकडे आकर्षित व्हावे म्हणून  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धनराज कुंटे, आकांक्षा चारभाई, शिवानी पांढरे, अे. आर. तुरकर, सुरेंद्र टेंभुर्णे, रोहित अतकरे,  कमोलिका मंडल, सुकन्या पाटील, आलेख तायवाडे, रितेश यादव, अखिलेश संगेवार, सुरज बावणे, अरमान इंदूरकर, निखिल ताकसांडे, मंगेश  वानखेडे हे सहभागी गायक होते. नटरंग चित्रपटातील नांदीने या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ‘एकदंताय विघ्नहर्ताय.., लुका छुपी  बहोत हुई.., सावरिया.., खेळ मांडला., इत्तीसी हसी.., अप्सरा आली.., कुहू कुहू बोले सावरिया..’ आदी वैविध्यपूर्ण गीतांनी हे सादरीकरण रंगले.  याप्रसंगी राग हंसध्वनीचे सादरीकरण झाले. ‘मोरया.मोरया..’ आणि वंदेमातरमने या कार्यक्रमाचे समापन झाले. सुनील इंदूवामन ठाकरे यांनी  परिचयात्मक काव्यात्मक प्रस्तावना केली. एजाजखान यांनी निवेदन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार नंदू अंधारे, मधुरिका गडकरी, प्रवीण  खापरे व कांचन चारभाई यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)
 

Web Title: The evening of 'Fusion music'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.