शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा आला तरी रस्त्यांची दुरुस्ती नाही; मुख्यमार्ग चकाचक अन् ग्रामीणमध्ये खड्डेच खड्डे !

By गणेश हुड | Updated: June 24, 2023 17:28 IST

निधीसाठी शासनाचा हात आखडता

नागपूर : जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग व इतर मार्गांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे आहेत. पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेले रस्ते मागील सात-आठ वर्षात दुरुस्त झाले नसल्याने पावसाळ्यात ग्रामीण भागातील लोकांना अडचणंचा सामना करावा लागणार आहे. रस्ते नादुरुस्त असल्याने अनेक गावातील एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. 

मागील वर्षाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पूल वाहून गेले होते. काही गावातील रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. याचा विचार करता ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शासनाकडे ६० कोटींची मागणी केली होती. मात्र फक्त ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून पुलाचे बांधकामही शक्य नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

तिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) आणि ग्रामीण मार्ग (व्हीआर), पुलांचे दरवर्षी मोठे नुकसान होते.  या रस्ते पुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून सरकारकडे निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले. गेल्या पाच वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पुलांच्या दुरूस्तीसाठी जि.प.कडून सरकारकडे ३२९ कोटींच्यावर निधीच्या मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र शासनाकडून फक्त ११५ कोटी मिळाले. 

मागितले ६६ कोटी मिळाले ५ कोटी

 २०२१-२२ या वर्षात जि.प.च्या बांधकाम विभागाला ४५ कोटींचा निधी मंजूर होता. तर  २०२२-२३ या वर्षात ४७ कोटींची मागणी जिल्हा नियोजनकडे केली होती. परंतु ४५ कोटी कामांनाच स्थगिती होती. तर २०२३-२४ या वर्षात ६६ कोटींची मागणी केली होती. मात्र जिल्हा नियोजनकडून फक्त ५ कोटींचा निधी मिळाला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूरRainपाऊस