जरीपटका पोलिसांकडील तपास गुन्हे शाखेकडे

By Admin | Updated: June 18, 2014 01:25 IST2014-06-18T01:25:11+5:302014-06-18T01:25:11+5:30

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा (कलम ३०७) गुन्हा नोंदविण्याचे व जरीपटका पोलिसांकडील तपास एक आठवड्यात गुन्हे

Even if the investigating agency is investigating the crime branch | जरीपटका पोलिसांकडील तपास गुन्हे शाखेकडे

जरीपटका पोलिसांकडील तपास गुन्हे शाखेकडे

हायकोर्ट : सुदीप जयस्वालांची याचिका मंजूर
नागपूर : जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा (कलम ३०७) गुन्हा नोंदविण्याचे व जरीपटका पोलिसांकडील तपास एक आठवड्यात गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, मंगळवारी दिले.
अ‍ॅड. जयस्वाल आणि कावेश व प्रवीण तलवार यांच्यात घराच्या बांधकामावरून भांडण झाले होते. दरम्यान, तलवार बंधूंनी दगड मारल्यामुळे जयस्वाल यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तत्पूर्वी जयस्वाल यांनी तलवार कुटुंबातील महिलेला अश्लील शिवीगाळ व विनयभंग केल्याचा आरोप आहे. दोन्ही पक्षांनी जरीपटका पोलिसांकडे एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवली. यावरून अ‍ॅड. जयस्वाल यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३५४ (अ)(४), ५०६ (ब), ३२३, तर तलवार बंधूंविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३२३, ३२५, ३५५, ५०६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
जयस्वाल यांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. परंतु, पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला नाही. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. वकिलांच्या अधिकारासाठी संघर्ष करताना जरीपटका पोलिसांसोबत अनेकदा वाद झाला. यामुळे ते पूर्वग्रहदूषित आहेत. त्यांचा तपास पारदर्शक नाही. परिणामी जरीपटका पोलिसांकडून तपास काढण्यात यावा व आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवावा, अशी त्यांची विनंती होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी त्यांची याचिका मंजूर केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Even if the investigating agency is investigating the crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.