शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या अनाथालयातील बच्चे कंपनींचा असाही रंगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:34 IST

अनाथाचा ठपका घेऊन जगणारी मुले-मुली गुरुवारी मस्त रंगात भिजली. धावून धावून एकमेकांना रंगात-पाण्यात बुडविले. पिचकाऱ्या उडवल्या, गुलाल उधळला. पोलीस अधिकाऱ्यांना घेरून त्यांच्या तोंडाला गुलाल फासला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या कल्पनेमुळे अनेक वर्षांत पहिल्यांदाच अनाथालयातील मुला-मुलींनी धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटला. या बच्चे आणि किशोरवयीन मुलांमुलीसोबत पोलीस अधिकारीही त्यांचे मित्र बनत रंगले, रंगात न्हाले.

ठळक मुद्देसाजरी केली पोलिसांसोबत धुळवडपोलीस अधिकाऱ्यांना घेरलेपिचकाऱ्या उडवल्या, गुलाल उधळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनाथाचा ठपका घेऊन जगणारी मुले-मुली गुरुवारी मस्त रंगात भिजली. धावून धावून एकमेकांना रंगात-पाण्यात बुडविले. पिचकाऱ्या उडवल्या, गुलाल उधळला. पोलीस अधिकाऱ्यांना घेरून त्यांच्या तोंडाला गुलाल फासला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या कल्पनेमुळे अनेक वर्षांत पहिल्यांदाच अनाथालयातील मुला-मुलींनी धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटला. या बच्चे आणि किशोरवयीन मुलांमुलीसोबत पोलीस अधिकारीही त्यांचे मित्र बनत रंगले, रंगात न्हाले.अनाथाचे जगणे नशिबी आलेली बच्चे कंपनी सणोत्सव केवळ दुरूनच बघतात. खूप इच्छा असूनही त्यांना कोणत्याच सणोत्सवाचा आनंद मनसोक्तपणे घेता येत नाही. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार कर्तव्यकठोर आहेत अन् संवेदनशिलही! कधीतरी त्यांनी अनाथालयातील मुलांच्या या अवस्थेला हेरले अन् होळी-धुळवडीचा बंदोबस्त आटोपल्यानंतर धुळवडीचा सण त्यांच्यासोबत साजरा करण्याचा मानस आपल्या परिमंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त केला. तशी तयारी करण्याचेही आदेश दिले. त्यानुसार कामठीचे ठाणेदार किशोर नगराळे आपल्या सहकाऱ्यांसह कामी लागले. बुधवारी सायंकाळपासून होळीच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळपासून धुळवडीचा बंदोबस्त आटोपला. त्यानंतर उपायुक्त पोद्दार यांच्यासह सहायक आयुक्त परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येत गणवेषातच कामठीच्या कस्तूरचंद डागा बालसदनात पोहचले. तेथील बच्चे कंपनीला आधीच कल्पना देऊन ठेवण्यात आली होती. सर्वांना पिचकाऱ्या, वेगवेगळा रंग, गुलालही आधीच पोहचवण्यात आले होते. त्यामुळे बच्चे कंपनी वाटच बघत होती. पोलीसदादा पोहचताच त्यांनी एकच हो-हल्ला केला. पोलीस उपायुक्त पोद्दार यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना बच्चे कंपनीने घेरले. तोंडाला गुलाल फासला. रंग लावला. एकमेकांवर पिचकाऱ्या उडवल्या. रंग उधळला. एकमेकांना चिंब केले. अनाथालयाच्या परिसराने पहिल्यांदाच एवढा आनंद, उत्साह अनुभवला होता.आतापर्यंतचा खरा रंगोत्सवसुमारे दोन तास मोठी मौजमस्ती चालली. नंतर गाठ्या, गोडधोड मिठाई झाली. मुले अगदीच आनंदात न्हाऊन निघाली होती. ज्यांनी हा आनंदोत्सव त्यांच्यासाठी आयोजित केला होता, त्या पोलीसदादात कुणी वडील बघितला. कुणी भाऊ बघितला तर कुणी आपला मामा, काका अन् पालकांचे रूप बघितले. त्यांच्यासोबत त्यांनी फोटो, सेल्फीही काढून घेतल्या. ही धुळवड या बच्चेकंपनीच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील खरा रंगोत्सव ठरली.

 

टॅग्स :HoliहोळीPoliceपोलिस