तीन वर्षानंतरही ठगबाज इंगळे फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:09 IST2021-03-25T04:09:18+5:302021-03-25T04:09:18+5:30
------------- बाईकचोरास अटक नागपूर : सक्करदरा पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणात चंद्रपूरच्या गुन्हेगारास साथीदारासह अटक केली. वैभव नामदेवराव शेंडे रा. ...

तीन वर्षानंतरही ठगबाज इंगळे फरार
-------------
बाईकचोरास अटक
नागपूर : सक्करदरा पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणात चंद्रपूरच्या गुन्हेगारास साथीदारासह अटक केली. वैभव नामदेवराव शेंडे रा. नागभीड, चंद्रपूर आणि सारंग सुरेश दहीकर रा. त्रिमूर्तीनगर अशी आरोपीची नावे आहेत. ५ मार्च रोजी भालदारपुरा येथील हमीद उल्ला खान यांची छोटा ताजबाग येथून बाईक चोरीला गेली होती. सक्करदरा पोलिसांना या प्रकरणात वैभवचा हात असल्याची माहिती मिळाली. वैभव प्रतापनगरातील लोखंडेनगरात राहतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा त्याने सारंगच्या मदतीने बाईक चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी सारंगलाही ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर दोघांकडून ४.६५ लाख रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पीआय शुभांगी देशमुख, चंद्रकांत यादव, एपीआय राजू बस्तवाडे, कर्मचारी विजय गुरुपुडे, संदीप बोरसरे, विद्याधर पवनीकर, योगेश डाफ, विश्वजित उके आणि हेमंत उईके यांनी केली.