शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तंबी नंतरही मर्जीतील कर्मचारी ‘रिलिव्ह ’नाही’, अनेक कर्मचारी मूळ कार्यालयातच

By गणेश हुड | Updated: July 19, 2023 16:15 IST

बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाही

नागपूर : मे महिन्यात जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया पार पडली. सर्व विभागांतील १५८ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांना ३० जून पर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे होते. मात्र, विभागप्रमुखांनी आपल्या मर्जीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही.  विशेष म्हणजे  मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी विभागप्रमुखांना तंबी दिल्यानंतरही मर्जीतील कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुखांनी रिलिव्ह केलेले नाही. 

बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ रिलिव्ह करा, अन्यथ नवीन बदली होवून आलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेता येणार नाही. असे शर्मा यांनी निर्देश दिले. जि.प. मुख्यालयात बदली करण्यात आलेले कर्मचारी येथे येण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे. काहींनी प्रतिनियुक्तीने सोयीच्या जागेसाठी प्रयत्न चालविले आहे. शासनाने ३० जून पर्यत बदल्यांना मुदतवाढ दिली होती. बदल्यांची प्रक्रीया पारदर्शक पार पडली असताना अनेक कर्मचारी आपला मूळ विभाग सोडण्यात तयार नसल्याचे दिसते. 

सीईओंच्या भूमिकेकडे लक्ष

प्रशासकीय बदलीनंतरही विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणे हा शिस्तभंगाचा प्रकार आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात वारंवार सूचना, निर्देश देण्यात आले. त्यानंतरही संबंधितांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. बदलीनंतरही संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन जुन्याच विभागातून काढले जात असल्याने सीईओ सौम्या शर्मा काय भूमिका घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदलीnagpurनागपूरEmployeeकर्मचारी