शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मजनुगिरी करणे महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:17 IST

मुलींना टोमणे मारणे आणि अश्लील शब्दात शिवीगाळ करीत ‘मजनुगिरी’ करणे एका तरुणास महागात पडले. याप्रकरणी नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करीत निखिल अरुण कुहीकर (२५) रा. परसोडी उमरेड या तरुणास अटक केली.

ठळक मुद्देशिक्षक पोहेचले ठाण्यात, तरुणास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलींना टोमणे मारणे आणि अश्लील शब्दात शिवीगाळ करीत ‘मजनुगिरी’ करणे एका तरुणास महागात पडले. याप्रकरणी नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करीत निखिल अरुण कुहीकर (२५) रा. परसोडी उमरेड या तरुणास अटक केली. उमरेड येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरू आहे. शहरातील एका शाळेमधील मुली क्रीडा स्पर्धेनंतर शाळेकडे जात होत्या. अशातच आरोपी निखिलने टोमणे मारून अश्लील शिवीगाळ केली. मुलींनी ही बाब शाळेतील मुख्याध्यापिकेला सांगितली. लागलीच शाळेतील शिक्षक आणि काही विद्यार्थिनींनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे, पोलीस निरीक्षक प्रकाश हाके, पोलीस उपनिरीक्षक आरती उघडे यांना ही गंभीर बाब सांगितली. संपूर्ण बाब ध्यानात येताच आरती उघडे यांनी दखल घेत आरोपीस तडकाफडकी अटक केली. उमरेड पोलीस ठाण्यात २९४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात आरती उघडे तपास करीत आहेत.आवर कोण घालणार?शाळा परिसर, बसस्थानक, शहरातील मुख्य चौकात सकाळी ११ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत काही विशिष्ट घोळक्यांचा जमाव ठिकठिकाणी दिसून येतो. एखादी घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्कता बाळगते. काही दिवसात पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती दिसून येते. अशाप्रकरच्या घटनांमुळे मुली, तरुणी आणि महिला वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण होत असून वेळीच याला आवर घातल्या गेला नाही तर पुन्हा एखादी मोठी घटना झाल्याशिवाय राहणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग