सुधाकर गायधनी यांना युरोपचा ‘विलियम ब्लेक’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:05+5:302021-07-18T04:07:05+5:30
नागपूर : प्रसिद्ध कवी सुधाकर गायधनी यांना युरोपातील रोमानिया येथील कॉन्टॅक्ट इंटरनॅशनल या नियतकालिकाने ‘विलियम ब्लेक’ हा काव्यक्षेत्रातील प्रतिष्ठेचा ...

सुधाकर गायधनी यांना युरोपचा ‘विलियम ब्लेक’ पुरस्कार
नागपूर : प्रसिद्ध कवी सुधाकर गायधनी यांना युरोपातील रोमानिया येथील कॉन्टॅक्ट इंटरनॅशनल या नियतकालिकाने ‘विलियम ब्लेक’ हा काव्यक्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे.
नियतकालिकाचे संपादक व वर्ल्ड अकादमी ऑफ लेटर्स या संघटनेचे व्हाईस चान्सलर प्रा. डॉ. लिविअु पेण्डेफुंडा यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याचे स्पष्ट करत गायधनींचे अभिनंदन केले आहे. यंदा या नियताकालिकाने जगातील पाच साहित्यिकांना वेगवेगळे पुरस्कार जाहीर केले आहे. त्यात रोमानियाच्या लिलियाना पोपा, कॅनडाचे ॲड्रीन जॉर्ज, रोमानियाचे वेरूनिका बलाज व लिविअु सोप्तेलेका आणि भारतातील सुधाकर गायधनी यांचा समावेश आहे. संपूर्ण आशियातून हा पुरस्कार प्राप्त झालेले गायधनी हे एकमेव साहित्यिक आहेत. ॲक्टा कॉन्टॅक्ट इंटरनॅशनलच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय अंकात गायधनींच्या 'संपूर्ण देवदूत' या काव्याचा इंझा सालपियात्रो यांनी केलेला इटालियन भाषेतील अनुवाद प्रकाशित झाला आहे. या पुरस्कारासंदर्भात डॉ. पेण्डेफुंडा यांनी गायधनी यांना पाठविलेल्या विशेष संदेशात ‘यू आर दी बेस्ट पोएट ऑफ दी न्यू मिलेनियम’ अशा शब्दात गौरविले आहे.
............