असंघटित कामगारांच्या हितासाठी संघटना स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:18+5:302021-02-09T04:10:18+5:30
देशातील ९४ टक्के कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. त्यात कंत्राटी कामगार, शेतमजूर, बांधकाम मजूर, घरकामगार, विणकर, हॉटेल कामगार, बिडी ...

असंघटित कामगारांच्या हितासाठी संघटना स्थापन
देशातील ९४ टक्के कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. त्यात कंत्राटी कामगार, शेतमजूर, बांधकाम मजूर, घरकामगार, विणकर, हॉटेल कामगार, बिडी कामगार, रिक्षाचालक, टंक लेखक, कचरा वेचक, सायकल दुरुस्ती कामगार, वाहन दुरुस्ती कामगार, हमाल आदींचा समावेश आहे. या कामगारांचे हित जोपासले जावे याकरिता या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. देश व राज्याच्या प्रगतीमध्ये असंघटित कामगारांचे मोठे योगदान आहे. असे असताना त्यांचे शोषण केले जाते. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही. कोरोनामुळे असंघटित कामगारांवर उपासमारीची वेळ आली. अनेक कामगार बेरोजगार झाले. अशा कामगारांना न्याय मिळवून देणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना कर्मचारी विमा योजनेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणे, कामगार महिलांना सुरक्षा मिळवून देणे हे या संघटनेचे उद्देश आहेत, असे लोखंडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत अमृत मेश्राम, राजेश अय्यर, यशवंत हांडे, सुनील पालिवाल, आरती पडोळे, रवी गिऱ्हे, राहुल फाळके, भूषण नागपुरे आदी उपस्थित होते.