भाजपाच्या स्थापना दिवसाला ४० नगरसेवकांची दांडी

By Admin | Updated: April 7, 2017 02:45 IST2017-04-07T02:45:53+5:302017-04-07T02:45:53+5:30

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त महाल भागातील टिळक पुतळा येथील पार्टीच्या कार्यालयाजवळ

The establishment of the BJP, 40 corporators of Dandi | भाजपाच्या स्थापना दिवसाला ४० नगरसेवकांची दांडी

भाजपाच्या स्थापना दिवसाला ४० नगरसेवकांची दांडी

शिस्तप्रिय पक्षात बेशिस्त : पक्षाकडून तंबी मिळणार
नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त महाल भागातील टिळक पुतळा येथील पार्टीच्या कार्यालयाजवळ गुुरुवारी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेतील पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले होते. तसेच याबाबतच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरही ४० हून अधिक नगरसेवकांनी या कार्यक्रमाला दांडी मारली.
महापालिकेत प्रथमच भाजपाला विक्रमी बहुमत मिळाले आहे. १५१ सदस्यांपैकी तब्बल १०८ सदस्य भाजपाचे आहेत. यात अन्य पक्षातून आलेले व नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या काही जणांचा समावेश आहे. तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. नगरसेवक ांना शिस्त लागावी. त्यांना सभागृहाच्या कामकाजाची माहिती व्हावी. याची जबाबदारी महापालिकेतील पक्षाच्या अनुभवी आजी- माजी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्रशिक्षण वर्गाचेही आयोजन करण्यात आले.
परंतु वेळोवेळी सूचना दिल्यानंतरही शिस्तप्रिय पक्षाच्या ४० हून अधिक नगरसेवकांनी स्थापना दिवसाच्या कार्यक्र माकडे पाठ फिरविली. यात महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांंचाही समावेश आहे. कार्यक्रमाला उपस्थित नगरसेवकांची हजेरी घेण्यात आल्याने हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. यातील सात नगरसेवकांनी वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला हजर राहता येणार नसल्याचे कळविले होते. परंतु उर्वरित नगरसेवकांच्या अनुपस्थितीचे कारण समजू शकले नाही. यावर पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी)

नगरसेवकांचा रेकॉर्ड तयार करणार
विकासाच्या मुद्यावर भाजपाने महापालिका निवडणूक लढविली. मतदारांनी भाजपा नेत्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवल्याने पक्षाला विक्रमी बहुमत मिळाले आहे. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी प्रभागातील विकासाची जबाबदारी नगरसेवकांवर आहे. त्यामुळे भाजपाच्या सर्व नगरसेवकांचा रेकॉर्ड तयार केला जात आहे. यात पक्षाच्या कार्यक्रमात सहभाग, प्रभागातील विकास कामांसाठी केलेले प्रयत्न अशा बाबींचा समावेश आहे.

पालकमंत्री अधिवेशनामुळे अनुपस्थित
भाजपाच्या स्थापना दिवस कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर क ोहळे यांच्यासह पक्षाचे शहर व जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार होते. परंतु विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे मुंबईत व्यस्त असल्याने या सर्वांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.

Web Title: The establishment of the BJP, 40 corporators of Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.