शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

ॲट्राॅसिटीचे गुन्हे अन्वेषणासाठी दक्षता समिती स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 23:45 IST

crime of atrocities , nagpur newsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ (ॲट्राॅसिटी ॲक्ट) तसेच १९५५ च्या कायद्यांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांवर लवकरात लवकर कारवाई हाेण्यासाठी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्यात यावी, अशा सूचना पुण्याचे समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

ठळक मुद्देसमाजकल्याण आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ (ॲट्राॅसिटी ॲक्ट) तसेच १९५५ च्या कायद्यांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांवर लवकरात लवकर कारवाई हाेण्यासाठी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्यात यावी, अशा सूचना पुण्याचे समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

ॲट्राॅसिटी कायद्यांतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची सभा मंगळवारी पार पडली. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या सभेत मुख्य आयुक्त प्रामुख्याने उपस्थित हाेते. तसेच सर्व विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पाेलीस अधीक्षक उपस्थित हाेते. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डाॅ. सिद्धार्थ गायकवाड यांनी कायद्यांतर्गत घडलेले गुन्हे, पाेलीस तपासावर असलेले गुन्हे, न्यायप्रविष्ट प्रकरणे, अर्थसहाय्यासाठी पात्र प्रकरणे व प्रलंबित प्रकरणांची माहिती दिली. खून, मृत्यू प्रकरणे किंवा कायम अपंगत्व आले असल्यास नाेकरी, पेन्शन व पुनर्वसनाचा शासन निर्णय आहे. त्यानुसार अशा प्रकरणांची माहिती विभागाला सादर करण्याचे आदेश समाजकल्याण आयुक्तांनी दिले. विभागीय आयुक्तांनीही प्रलंबित प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पाेलीस विभागाला दिले.

क्लस्टर निर्मितीसाठी शेतकरी गट

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान याेजनेंतर्गत पीडित कुटुंबीयांना जमिनी देण्यात आल्या आहेत. त्या जमिनीचा विकास करण्यासाठी कृषी विभागासाेबत समन्वय साधून क्लस्टर तयार करण्यासाठी शेतकरी गट तयार करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दलित वस्तीत भेटी द्याव्या

सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती व नवबाैद्ध मुलामुलींसाठी शासकीय निवासी शाळा, आश्रमशाळेत सीबीएसइ पॅटर्न सुरू करता येईल यासाठी गॅप ॲनालिसिस करता येईल तसे करणे आणि सामाजिक सुधारणांसाठी महिन्यातून एकदा सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दलित वस्तीला भेटी देणे आवश्यक असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाcollectorजिल्हाधिकारी