शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सराफांचे क्लस्टर स्थापन करा, सीमा शुल्क ५ टक्क्यांवर आणा; असोसिएशनची मागणी 

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 3, 2024 19:51 IST

सराफा व्यवसाय वाढीसाठी सीमा शुल्क १० वरून ५ टक्क्यांवर आणावा आणि कोरोना काळात लादलेला २.५ टक्के सेवा कर रद्द करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

नागपूर: सराफा व्यवसाय वाढीसाठी सीमा शुल्क १० वरून ५ टक्क्यांवर आणावा आणि कोरोना काळात लादलेला २.५ टक्के सेवा कर रद्द करावा. त्यामुळे सराफा व्यवसायात वाढ होईल आणि पारदर्शकता येईल. सराफांचे क्लस्टर स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने नागपूरच्या मध्यवर्ती भागात जागा उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे सोने व हिऱ्यांचे दागिने नागपुरात तयार होतील. त्यामुळे मुंबई वा देशातील अन्य उत्पादकांवर सराफांना अवलंबून राहावे लागणार नाही. 

भारतातून ६० टक्के दागिन्यांची निर्यात होते. त्यामुळे विदेशी नागरिकांना स्थानिक बाजारातून दागिने खरेदीवर जीएसटीचा परतावा मिळावा. त्यामुळे स्थानिक व्यवसायात अनेक पटीने वाढ होईल. हॉलमार्कचे अधिकारी चुकीचा फायदा घेतात. सरकारची मान्यता असलेल्या हॉलमार्क सेंटरमधून दागिने टेस्टिंगसाठी नेतात आणि चेन्नईत पाठवितात. हे दागिने ६ महिने ते एक वर्षापर्यंत व्यापाऱ्यांना परत मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होते. दागिन्यांची टेस्टिंग नागपुरातच करावी. दागिन्यांचे हॉलमार्किंग सरकारच्या मान्यमाप्राप्त हॉलमार्किंग सेंटरमध्ये होत असल्याने दागिने तपासणीची जबाबदारी सराफांवर न टाकता प्रयोगशाळेवर टाकावी. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार राज्य आणि स्थानिक सराफा दक्षता समिती आता नेहमीसाठीच असावी. त्यामुळे सराफांची सुरक्षा अबाधित राहील. याशिवाय अनेकविध मागण्यांची पूर्तता राजकीय नेत्यांनी करावी, अशी मागणी नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे आणि सचिव राजेश रोकडे यांनी केली आहे.

या आहेत अपेक्षा :- व्यवसाय वाढीसाठी सीमाशुल्क १० वरून ५ टक्क्यांवर आणावा आणि २.५ टक्के सेवा शुल्क रद्द करावा.- दागिने निर्मिती क्लस्टर स्थापनेसाठी सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी.- विदेशी नागरिकांना दागिने खरेदीवर जीएसटी परतावा मिळावा.- सुरक्षेसाठी राज्य व स्थानिक दक्षता सराफा समिती कायम असावी.- हॉलमार्किंगची जबाबदारी सराफांऐवजी सेंटरवर टाकावी.- बीआयएस अधिकाऱ्यांनी हॉलमार्किंग दागिन्यांची तपासणी चेन्नईऐवजी स्थानिक स्तरावर करावी.

टॅग्स :nagpurनागपूरGoldसोनं