शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस व गारपिट : नागपूर जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 20:47 IST

मागील तीन दिवसात नागपुरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज : ५ तालुक्यातील ११६ गावांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील तीन दिवसात नागपुरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे. येत्या १० दिवसात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल.३१ डिसेंबर, आणि १ व २ जानेवारी या दिवशी नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह गारपीटही झाली. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर , हरभरा, गहू या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी व लोकप्रनिधींनुसार जवळपास ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील जवळपास १३ हजार हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संत्रा व मोसंबीचे ४ हजार हेक्टरवरील फळांचे नुकसान झाले आहे.तर ३ हजार हेक्टरवरील तुरीचेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कळमेश्वर, काटोल, सावनेर, रामटेक, नागपूर ग्रामीणचा काही भाग अशा ५ तालुक्यातील ११६ गावांना या गारपिटीचा फटका बसल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगितले जाते. सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आलेले आहेत. येत्यादहा दिवसात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल.सर्वेक्षणाचे काम सुरुगारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाच्या प्राथमिक अंदजानुसार २२ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ह अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला आहे. सर्वेक्षणाचे काम आजपासून सुरु झाले आहे.रवींद्र ठाकरेजिल्हाधिकारी नागपूर

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर