आदासा येथे पर्यावरण मार्गदर्शन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:41+5:302021-06-09T04:10:41+5:30
कळमेश्वर : वन विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदासा (ता. कळमेश्वर) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ग्रामपंचायत, ...

आदासा येथे पर्यावरण मार्गदर्शन कार्यक्रम
कळमेश्वर : वन विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदासा (ता. कळमेश्वर) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ग्रामपंचायत, वनव्यवस्थापन समिती व स्वयंसहायता बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्यांना पर्यावरण संवर्धन यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
आदासा येथील निसर्ग निर्वाचन केंद्रात आयाेजित कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नाैकरकर, सरपंच नीतू सहारे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष चेतन निंबाळकर, क्षेत्र सहायक सुनील फुलझेले, बी. रक्षक गोविंद मेंढे उपस्थित हाेते. यावेळी अर्चना नाैकरकर यांनी पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे, त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, पर्यावरणविषयक ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती, प्रत्यक्ष अनुभव याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी दुर्गामाता स्वयंसहायता बचत गट, सावित्रीबाई फुले स्वयंसहायता बचत गट, माऊली स्वयंसहायता बचत गट, विघ्नहर्ता स्वयंसहायता बचत गट, महालक्ष्मी स्वयंसहायता बचत गट, जनलक्ष्मी स्वयंसहायता बचत गट, वैशाली स्वयंसहायता बचत गट, आधार स्वयंसहायता बचत गट, गणेश स्वयंसहायता बचत गटांच्या महिला सदस्य उपस्थित होत्या. यशस्वितेसाठी वनमजूर रफीक मोहब्बे, बी. एस. बोरकर, श्रावण नागपुरे, मंगेश पांडे यांनी सहकार्य केले.