शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे नागपुरात हजारो झाडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 20:56 IST

बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळत आहे.

ठळक मुद्देगोवऱ्या व मोक्षकाष्ठाचा वापर : नागपूर शहरातील नागरिकांचाही प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळत आहे.२०१३ मध्ये पर्यावरणपूरक पथदर्शी प्रकल्प म्हणून अंबाझरी घाटाची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला या उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु जनजागृती व नागरिकांची पर्यावरणाविषयीची जागरूक ता यामुळे हळूहळू या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला. आता महापालिकेच्या अंबाझरी, मोक्षधाम, मानेवाडा व मानकापूर यासह प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी गोवरी व मोक्षकाष्ठ याचा वापर केला जात आहे. लाकडाचा वापर थांबल्याने हजारो वृक्षांना जीवनदान मिळाले आहे.मनपातर्फे पर्यावरण रक्षणार्थ अनेक प्रयत्न करण्यात येतात. यात झाडे लावणे, झाडे जगवणे, नद्या स्वच्छ करणे, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, पर्यावरणपूरक दहनाची व्यवस्था आदींचा समावेश आहे. झाडे वाचविण्यासाठी शहरातील अंबाझरी व मोक्षधाम दहनघाटावर एलपीजी शवदाहिनी व गंगाबाई तसेच वैशालीनगर घाटावर शवदाहिनी लावलेली आहे. अन्य दहनघाटावर एलपीजी दाहिनी लावणे प्रस्तावित आहे. पाच दहनघाटावर शेणाच्या गोवऱ्या व मोक्षकाष्ठ यांचा उपयोग करून अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.७,२०० झाडांना जीवनदानदर महिन्याला सुमारे ३०० अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक पद्धतीने केले जातात. नागपूर शहरात अंत्यसंस्कारासाठी मोक्षकाष्ठ व गोवऱ्यांचा वापर होत असल्याने दर महिन्याला १५ वर्षे वयाच्या सुमारे ६०० झाडांना जीवदान दिले जात आहे. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी १५ ते २० वर्षे वयाच्या दोन वृक्षांचा बळी जातो. त्यानुसार आता या शहरात एका महिन्यात सुमारे ६०० आणि एका वर्षात सुमारे ७,२०० झाडांना जीवदान मिळत आहे.कोट्यवधी वृक्ष वाचतीलपर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची पद्धत संपूर्ण राज्यात लागू झाली तर कोट्यवधी वृक्ष वाचवण्यात यश येईल. पर्यावरण संवर्धनाला मोठी मदत होणार आहे. महापालिकेने ही संकल्पना मांडली, परंतु नागरिकांनीही याला प्रतिसाद दिल्याने हा उपक्रम राबविणे शक्य झाले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणnagpurनागपूर