उद्योजकाला २८ लाखांनी गंडविले

By Admin | Updated: April 20, 2016 03:17 IST2016-04-20T03:17:56+5:302016-04-20T03:17:56+5:30

स्थानिक लालाओळीतील उद्योजकाला दलालाने २८ लाख ६६ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

The entrepreneur was shocked by 28 lakhs | उद्योजकाला २८ लाखांनी गंडविले

उद्योजकाला २८ लाखांनी गंडविले

कामठीत गुन्हा दाखल : आरोपी दलालाचा शोध सुरू
कामठी : स्थानिक लालाओळीतील उद्योजकाला दलालाने २८ लाख ६६ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आरोपी दलालाचा शोध घेणे सुरू केले आहे.
सुनील शंकरलाल अग्रवाल (५३, रा. लालाओळ, कामठी) यांची कामठीत मोहनलाल शंकरलाल नामक फर्म व चक्रधर राईस मिल आहे. ते विदर्भातील विविध शहरांमध्ये या फर्मच्या माध्यमातून धान्य पुरवठा करतात. पंकज मोदी (४०, रा. गणेशनगर, गोंदिया) हे धान्याचे मोठे दलाल आहेत. मोदी हे अग्रवाल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी करायचे व तो तांदूळ गोंदियाआणि इतर बाजारपेठेत विकायचे. मागील काही वर्षांपासून त्यांचा व्यवहार सुरळीत सुरू होता.
दरम्यान, मोदी यांनी अग्रवाल यांच्याकडून ९ जून २०१२ रोजी ६ लाख ६५ हजार १६७ रुपये किमतीचा ८६४ बॅग तांदूळ खरेदी केला. त्यानंतर १४ सप्टेंबर २०१२ ला ४ लाख ६५ हजार ४१९ रुपये किमतीचा ८९५ बॅग, २४ डिसेंबर २०१२ ला २ लाख १२ हजार ८१६ रुपये किमतीचा ८५० बॅग, १० एप्रिलला ५ लाख ४२ हजार ९३१ रुपये किमतीचा ७२९ बॅग, ३१ जानेवारी २०१३ ला २ लाख २५ हजार ६४ रुपये किमतीचा ३४५ बॅग, १ एप्रिल २०१३ ला ४ लाख १७ हजार ३३५ रुपये किमतीचा ५८८ बॅग तसेच त्याच दिवशी ४ लाख ३७ हजार ५४४ रुपये किमतीचा ६१५ बँग तांदळाची खरेदी केली.
या काळात मोदी यांनी अग्रवाल यांच्याकडून एकूण २८ लाख ६६ हजार २७६ रुपये किमतीच्या तांदळाची खरेदी केली.
दरम्यान, अग्रवाल यांनी मोदी यांच्याकडे वारंवार या रकमेची मागणी केली. कोणतीही कारणे सांगून मोदी यांनी रक्कम देण्याचे टाळले. शेवटी अग्रवाल यांनी गोंदिया येथे जाऊन मोदी यांच्याकडे रकमेबाबत चौकशी केली. तेव्हा सदर तांदळाच्या बॅग आपल्यापर्यंत पोहोचल्या नसल्याचे मोदी यांनी अग्रवाल यांना सांगितले व सदर रक्कम देण्यास नकार दिला.
या व्यवहारात फसगत झाल्याचे लक्षात येताच सुनील अग्रवाल यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात पंकज मोदी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि ४२०, ४०९, ४०६ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष चचेरे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The entrepreneur was shocked by 28 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.