शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कुटुंबीय झाले १९७१ च्या लढाईत सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:38 IST

ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या शौर्याची गाथा मात्र अमर राहील. शिस्तबद्ध आयुष्य जगलेले ब्रिगेडियर सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धूळ चारली होती. १९७१ च्या युद्धात तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय लढाईत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपली अखेरची मुलाखत ‘लोकमत समाचार’च्या ‘दीप भव’ या विशेषांकासाठी दिली होती. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील विविधांगी पैलू जगासमोर आले होते.

ठळक मुद्देब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी ‘लोकमत’ समूहाला दिली अखेरची मुलाखत : एका फौजीची अमर शौर्यगाथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या शौर्याची गाथा मात्र अमर राहील. शिस्तबद्ध आयुष्य जगलेले ब्रिगेडियर सिंह यांनी आपल्या कर्तृत्वाने शत्रूला धूळ चारली होती. १९७१ च्या युद्धात तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय लढाईत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपली अखेरची मुलाखत ‘लोकमत समाचार’च्या ‘दीप भव’ या विशेषांकासाठी दिली होती. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील विविधांगी पैलू जगासमोर आले होते.३ डिसेंबर १९७१ रोजी भारत-पाक सीमेवर लोंगोवाल ‘पोस्ट’वर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला होता. पाकिस्तानी सैन्याचा मोठा काफिला होता व लोंगोवाल ‘पोस्ट’वर केवळ १२५ भारतीय जवान होते. मात्र त्यांच्या नेतृत्वात सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याचा सामना केला. पाकिस्तानचे ६० ‘टँक’ नष्ट करण्यात भारतीय सैन्यदल व वायुदलाला यश आले होते. कुलदीप सिंह यांनी चाणाक्षपणे सैन्याची व्यूहरचना केली होती. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना महावीर चक्र तसेच सहा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९७१ च्या युद्धात त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी होते. त्यांचे दोन काका ‘एअरफोर्स’मध्ये ‘फायटर पायलट’ होते व त्या दोघांनाही शौर्यचक्र मिळाले होते. त्यांचे आजोबा सरदार बहादूर सिंत सिंह हेदेखील सैन्यात होते. त्यांच्या मेहुण्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनीच आपल्या मुलाखतीत दिली होती. कुलदीप सिंह चांदपुरी व त्यांच्या बटालियनच्या शौर्यगाथेवर ‘बॉर्डर’ हा चित्रपटदेखील तयार झाला होता. कुलदीप सिंह चांदपुरी हे अखेरपर्यंत फौजी म्हणूनच जगले व आपल्या कार्यातून त्यांनी तरुण पिढ्यांना मौलिक प्रेरणा दिली.

टॅग्स :warयुद्धIndiaभारत