शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

काँग्रेसमध्ये उत्साह, भाजपा बेचैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:17 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभेत काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह ...

ठळक मुद्देजागोजागी विजयाचा जल्लोष : मिठाई वाटली, फटाके फोडलेदेवडिया भवन, मनपातून निघाली बाईक रॅली

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभेत काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. देवडिया काँग्रेस भवनात बऱ्याच कालावधीनंतर विजयी जल्लोष बघायला मिळाला. मनपामध्येही काँग्रेसच्या नगरसेवकांनी आनंद साजरा केला. मात्र भाजपाच्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. 

देवडिया भवनात जल्लोषमंगळवारी शहर काँग्रेस कार्यालयात जल्लोषाचे वातावरण सुरू होते. काँग्रेस जसजशी विजयाकडे वाटचाल करीत होती, तसतसे कार्यकर्ते जमायला लागले होते. विजयाचा कौल लक्षात येताच फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटायला सुरुवात झाली. ढोलताशांचा गजरावर कार्यकर्ते ठेका घेऊ लागले. उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटोचा, अभिजित वंजारी, ईरशाद अली, महेश श्रीवास, शेख हुसैन, रिंकू जैन, निर्मला बोरकर, अक्षय समर्थ, रमेश पुणेकर, प्रशांत धवड, राजेश पायतोडे, जगदीश गमे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. 
मनपात वाटली मिठाईमनपाचे विरोधी पक्षनेता तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात मिठाई वाटून फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. 
युवक काँग्रेसची बाईक रॅलीयुवक काँग्रेसचे सचिव बंटी शेळके व शहराध्यक्ष तौसिफ खान यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली. यादरम्यान नागरिकांना मिठाई वाटण्यात आली. रॅलीत फजलूर रहमान कुरैशी, शहनवाज खान चिस्ती, अजहर शेख, नावेद शेख, स्वप्निल ढोके, बाबू खान, विजय मिश्रा, हेमंत कातुरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर