शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाचा आनंद घ्या, जीवावर बेतेल असे धाडस करू नका

By आनंद डेकाटे | Updated: July 5, 2024 17:36 IST

जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर : नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी असलेली विविध स्थळे, तलाव, ओढे, नदीचे किनारे, धरणे ही पर्यटकांना नेहमी भूरळ घालतात. पर्यटनाचा आनंद घेताना आपल्या जीवावर धाडस बेतणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सर्व दक्षता व योग्य ती खबरदारी घेतली असून नागरिकांनी स्वयंशिस्त व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात विशेषतः वाकी, झिल्पी, खिंडसी, वेणा अंबाझरी, रामा, राखी इत्यादी तलाव आहेत. तसेच कन्हान, पेंच, वेना इत्यादी नदी व आंभोरा देवस्थान, घोघरा महादेव, धापेवाडा विठ्ठल मंदिर आहेत. या वर्दळीच्या ठिकाणांवर दुर्घटना व आपत्ती टाळण्यासाठी व त्याच्यावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित खात्यांच्या विभाग प्रमुखांना आपत्ती व्यवस्थानांतर्गत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिले आहे.

तलाव, नदी, व इतर जलाशय ठिकाणांच्या कड्यांवर असलेले प्रेक्षणीय पाईंटस या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करुन त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेखा आखावी व त्या नियंत्रण रेषेच्या पुढे पर्यटक जाणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात यावी, तेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून स्पष्ट सूचना असलेले फलक लावणेत यावेत. पर्यटकांसाठी 'काय करावे आणि काय करु नये' या बाबतचे सूचना फलक लावण्यात यावे. आपत्ती प्रवण जलपर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीव रक्षक लाईफ जॅकेटस, रेस्क्यू बोटी इत्यादी ठेवण्यात यावे. आवश्यकतेनुसार स्थानिक पातळीवर अशा जलपर्यटन ठिकाणी वेळेचे बंधन ठेवावे. नदी, नाले यांच्यावरील पुलावरून किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असल्यास संबंधित विभागाने असे रस्ते बंद करून तेथील वाहतूक तात्पुरती बंद करावी. जे रस्ते, पुल आपत्तीप्रवण आहेत अशा ठिकाणी काही अंतराआधीच चेतावणीचे फलक लावावे.जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात पर्यटनाच्या ठिकाणी जीवितहानी होणार नाही यासाठीच्या उपाययोजनांची काटेकारपणे अंमलबजावणी करण्यात यावी. दिरंगाई किवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी आणि विभाग प्रमुख हे जबाबदार राहतील, याची नोंद घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलnagpurनागपूर