शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

रिसोर्टमध्ये मनसोक्त आनंद लुटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:06 IST

डॉ. राजेंद्र एस. पडोळे दि टायगर पॅराडाईज रिसोर्ट व वॉटर पार्क रोजगार देण्याचे स्वप्न पूर्ण नागपूर : कोरोना काळात ...

डॉ. राजेंद्र एस. पडोळे

दि टायगर पॅराडाईज रिसोर्ट व वॉटर पार्क

रोजगार देण्याचे स्वप्न पूर्ण

नागपूर : कोरोना काळात लोक घरात बंदिस्त झाले होते. आता ते एखाद्या निसर्गरम्य वातावरणात आणि आवडीच्या ठिकाणी सुट्या घालवत आहेत. त्यातच नागपूरपासून ५२ किमी अंतरावरील दि टायगर पॅराडाईज रिसोर्ट अ‍ॅण्ड वॉटर पार्क निसर्गरम्य ठिकाण लोकांसाठी उपलब्ध आहे. वीकेंड सुट्या घालवून मनाला आल्हाद देणारे हे ठिकाण आहे. राजकीय, सामाजिक , बांधकाम आणि कला क्षेत्रात नाव कमविल्यानंतर डॉ. राजेंद्र पडोळे यांनी या रिसोर्टची उभारणी ७.५ एकरात केली. लोकांनी किफायत दरातील रिसोर्टमध्ये जाऊन कऱ्हांडला जंगल सफारीचा आनंद लुटावा, असे पडोळे यांचे आवाहन आहे.

रिसोर्ट व वॉटर पार्क नागपूरपासून ५२ किमी, उमरेडपासून ५ किमी अंतरावर भिवापूर मार्गावर कऱ्हांडला-तिरखुरा गावात अभयारण्य कऱ्हांडला गेटलगत आहे. पॅकेजची सोय आहे. जंगल सफारीकरिता बुकिंग करून देण्यात येते. अनेकदा गेटवर वाघ आणि अन्य प्राणी दिसतात. २०१७ मध्ये बांधकाम सुरू होऊन २०१९ मध्ये रिसोर्ट लोकांसाठी खुले झाले. आतापर्यंत १० हजार लोकांनी भेटी दिल्या आहेत. येथे २६ खोल्या असून १८ कोटींची गुंतवणूक केली आहे. पडोळे म्हणाले, या गोष्टीचा गंध नव्हता, पण आवड आणि काम तडीस नेण्याच्या जिद्दीने प्रकल्प दोन वर्षांतच बांधून पूर्ण केला. लग्नसमारंभासाठी लोकांची पहिली पसंती आहे. कॉन्फरन्स व अन्य कार्यासाठी रिसोर्ट खुले असते. कोरोनानंतर रिसोर्ट लोकांसाठी खुले झाले आहे. वीकेंडला दोन दिवस थांबून मनोरंजन आणि जंगल सफारीचा आनंद घेता येतो. पाणी अडवा, पाणी जिरवा, या प्रकल्पाची निर्मिती रिसोर्टमध्ये केल्याने शाळा आणि कॉलेजच्या सहलींसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

पडोळे म्हणाले, लहापणापासूनच लोकांना रोजगार देण्याच्या इच्छेमुळे रिसोर्टची उभारणी केली. स्थानिक १०० पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला आहे. रिसोर्ट नेहमीच फुल्ल असते. सिव्हील इंजिनियर मुलगा रिषभ पडोळे प्रकल्पाचे संचालन करतो. तो ‘अ‍ॅट्रॉसिटी’ मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. मनोरंजनाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली असल्याने रिसोर्ट लोकांच्या आवडीचे ठिकाण बनले आहे.

डॉ. राजेंद्र पडोळे व्यवसायाने इंजिनियर आहेत. ते काही काळ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. शिक्षण घेत असताना १९ व्या वर्षीपासून इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय सुरू केला. २००३ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र व्यापक आणि सर्वांसाठी खुले झाल्यानंतर त्यांनी डेव्हलपर्स व बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले. २००४ मध्ये न्यू प्रॉस्पॉरिटी लॅण्ड डेव्हलपर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स प्रा.लि. कंपनी स्थापन केली. तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. व्यवसायात यश संपादन केले. कंपनीचे कार्यालय जी-१, तुळजा भवानी अपार्टमेंट, छत्रपती हॉलजवळ, छत्रपतीनगर येथे आहे. कंपनीने जवळपास ४० ले-आऊट विकले आहेत. हजारो संतुष्ट ग्राहक आहेत. वानाडोंगरी, गोटाळपांजरी, घोगली, बेसा, चिकना, धामना, कालडोंगरी, कुही हे त्यापैकी काही आहेत. ग्राहकांचा विश्वास संपादन केला. मानेवाडा येथे कलावती-मंजुषा नावाने स्कीम, मुंबईत (नेरळ) दीड एकरात साई-ताज रेसिडेन्सी स्कीम उभारली. आता वानाडोंगरी येथे पाच एकरात ४०० फ्लॅट, ५० रो-हाऊसेस व व्यावसायिक संकुलाची स्कीम उभारणार आहे.

पडोळे यांना कलेची लहापणापासूनच आवड आहे. ते उत्तम गायक आहेत. त्यांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ आणि पोथराज समाजावर आधारित ‘वाक्या’ मराठी चित्रपट काढला. सध्या सामाजिक विषयावर आधारित ‘विटाळ’ चित्रपटाची तयारी सुरू आहे. या चित्रपटाचा शुभारंभ १५ ऑगस्टला रिसोर्टमध्ये होणार आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका बजावणारे चालू पांडे उर्फ दयाशंकर पांडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. पुढेही चित्रपट निर्मितीचा क्रम सुरूच राहणार आहे. कंपनी सुरू केल्यानंतर मित्रमंडळींना जोडले, त्यांना रोजगार देऊन स्वत:च्या पायावर उभे केले. कोरोना काळात अनाथ झालेल्या १० ते १५ मुलांची जबाबदारी घेण्याची इच्छा आहे. या सर्व कामात पत्नी मनिषा आणि मुलगा रिषभ यांचे सहकार्य नेहमीच असते. मनिषा स्त्रीधन महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा आहेत.

व्यवसायसंपन्न डॉ. राजेंद्र पडोळे म्हणाले, लहानपणी समाजसेवेसाठी राजाभाऊ हातेकर गुरुजींनी प्रेरित केले. गिरीश देशमुख यांच्या भेटीचा योग आला. दिलीप जाधव यांनी व्यवसायासाठी प्रेरणा दिली. पुढे व्यावसायिक , सामाजिक व राजकीय गोष्टी घडत गेल्या. सन २०१४ मध्ये दक्षिण-पश्चिम क्षेत्रात देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढविली. २० हजार मते घेतली होती. याशिवाय समाजसेवेची आवड आहे. सर्व समाजातील लोकांसाठी समाजकार्य करण्याचे व्रत आहे. ते आयुष्यभर पार पाडणार आहे.

पडोळे म्हणाले, अडचणींवर मात करून यश संपादन करण्याचे नाव जीवन आहे. जीवनाचे पॅकेज ६० ते ७० वर्षांचे असते. या वर्षांत जे चांगले वाटेल ते आणि आनंद व संतुष्टी मिळेल, ते काम करावे. चांगले काम करताना नफा-तोट्याचा विचार करीत नाही. इमानदारीने काम केल्यास कोणत्याही क्षेत्रात पैसा, आनंद, संतुष्टी मिळतेच.